पुणे : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीचा खून ,औंधमधील घटना; आरोपी फरार

पुणे : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन तिचा खून करण्यात आल्याची घटना औंध परिसरात बुधवारी घडली. पसार झालेल्या तरुणाचा चतु:शृंगी पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

श्वेता रानवडे (वय २६, रा. ओैंध) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती बहिणीसोबत दुपारी औंध जकात नाका परिसरातून चालली होती. त्या वेळी तरुणाने तिला अडवले. तिच्या गळ्यावर चाकूने वार करुन तो फरार झाला. श्वेेता गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे; तसेच तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Follow us -

संबंधित तरुणाचे एकतर्फी प्रेम होते. त्याची एका विवाह समारंभात श्वेताशी ओळख झाली होती. तेव्हापासून तो तिला त्रास देत होता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



हे पण वाचा-
“पुढील २४ तासांमध्ये हे प्रकार थांबले नाहीत तर तसं झालं नाही तर निर्माण होणाऱ्या परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री जबाबदार रहातील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल,””; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन झालेल्या हल्ल्यांवरुन पवारांचा थेट इशारा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply