पुणे : उरुळी कांचन येथे दरोडेखोरांच्या सशस्त्र हल्ल्यात महिला जखमी

उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील पंढरस्थळ परिसरात पाच दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकत एक तोळा सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एक महिला जखमी झाल्या आहेत. ही घटना रविवारी (ता. २५ ) मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमरास घडली आहे. तर अन्य एका ठिकाणी या दरोडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. बेबी महादेव उर्फ बळी कांचन (वय- २५ ), रा. पांढरस्थळ, उरुळी कांचन, ता. हवेली असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील पांढरस्थळ या ठिकाणी महादेव उर्फ बळी तुकाराम कांचन व त्यांची पत्नी हे दोघेच राहतात. रविवारी संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घराचे दार बंद करून झोपले होते. सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास एका दरोडेखोराने खिडकीचे खिळे काढून खिडकी उघडली. खिडकीतून हात घालून खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडता आला नाही. तेव्हा बाहेर पडलेल्या काठीच्या सहाय्याने दरवाज्याची कडी उघडली व घरामध्ये प्रवेश केला. स्वयंपाक घरात अतिल बाजूस राहणाऱ्या खोलीत बेबी व बळी कांचन हे दांपत्य झोपी गेले असताना या पाच दरोडेखोर यांनी या दांपत्याला चाकूचा धाक दाखवून वेठिस धरले. यापैकी काहींनी घरातील साहित्याची उलथापालथ करीत घरात पैसै तसेच दागिने आहेत का? अशी विचारणा करुन दांपत्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. जखमी बेबीबाई यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हा त्यांच्या दोन्ही हाताला पंधरा टाके पडले असल्याची माहिती मिळाली. घरात पैसै तसेच दागिने आहेत का? अशी विचारणा करुन दांपत्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, अखेर या दरोडेखोरांना अन्य काही हाती न लागल्याने बळी कांचन यांना चाकू दाखवून कानातील व गळ्यातील दागिने ओरबाडून पळ काढला आहे. या झटापटीत महिलेच्या दोन्ही हाताने चाकूचा वार बसला आहे. या झटापटीत आरडाओरडा झाल्याने हे पाच दरोडेखोर पसार झाले आहेत. या ठिकाणी परिमंडळ ५ च्या उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहाय्यक आयुक्त बजरंग देसाई, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण धायगुडे, उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply