
पुणे : चांदणी चौक परिसरातील जुना उड्डाणपूल २ ऑक्टोबरला मध्यरात्री स्फोटकांनी पाडण्यात येणार आहे. वाहतूक बंद ठेवून २०० मीटर परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, पुलापासून काही अंतरावर किंवा १०० ते २०० मीटरच्या परिघात असलेल्या इमारतींचे मालक किवा सोसायट्यांमधील रहिवाशांना प्रशासनाकडून अद्याप पूल पाडताना निर्माण होणारी संभाव्य स्थिती आणि दक्षतेबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेला नाहीत. त्यातून पूल पाडण्याआधी या भागात संभ्रमांचे ‘स्फोट’ होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना योग्य ती माहिती पुरवावी, अशी मागणी केली जात आहे.
मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतुकीची कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने चौकातील पूल पाडण्यात येणार आहे. प्रशासनाकडून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पूल पाडण्यासाठी ६०० किलो स्फोटके वापरण्यात येणार आहेत. २ ऑक्टोबरला मध्यरात्री स्फोट घडवून पूल पाडण्यात येणार आहे. केवळ पाच ते सहा सेकंदात हा पूल जमीनदोस्त होणार आहे. चांदणी चौकातून सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत दररोज तब्बल तीन लाख दहा हजार वाहने प्रवास करतात. पूल पाडल्यानंतर राडारोडा काढून रस्ता मोकळा करण्यात येणार असून, रात्री ११ ते रविवारी (२ ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेपर्यंत या ठिकाणची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियोजनही प्रशासनाने केले असून, स्फोटाच्या कालावधीत २०० मीटरपर्यंतचा भाग निर्मनुष्य केला जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. मात्र, याबाबत पुलाजवळच्या भागातील सोसायट्या आणि इमारतीतील नागरिकांना दक्षतेबाबत अद्याप प्रशासनाकडून कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे.
पूल पाडण्याच्या स्फोटाबाबत आणि नागरिकांनी घेण्याच्या दक्षतेबाबत स्थानिकांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी राज्य वाहतूकदार प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे. शिंदे यांनी याबाबत सांगितले, की पूल पाडण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. पुलापासून १०० ते २०० मीटरच्या भागात मेघ मल्हार, झिनिया, अल्फा, शिवपदम, प्रथमेश, सुमिधा आदी मोठ्या सोसायट्या आहेत. माझ्याही हॉटेलची इमारत पुलापासून काही अंतरावर आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप आम्हाला दक्षतेबाबत किंवा स्फोटाच्या होणाऱ्या किंवा न होणाऱ्या परिणामांबाबत कोणतीही अधिकृत माहिती पुरविलेली नाही. प्राधिकरणाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनाही याबाबत पत्र दिले आहे. परंतु, त्याला कोणतेही उत्तर मिळाले नाही.
चांदणी पूल स्फोट घडवून पाडण्यात येणार असल्याने पुलापासून काही अंतरावर राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षेबाबत विविध प्रश्न आहेत. अशा स्फोटाचा आम्हाला पूर्वानुभव नाही. पूल पाडणार असल्याच्या रात्री आम्ही नेमकी काय दक्षता घ्यायची. त्याचा आम्हाला काही धोका आहे किंवा नाही, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात न आल्याने नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम असल्याचे मत शिवपदम को. हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष नितीन देवरे यांनी व्यक्त केले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

