पाकिस्तानातील कराचीमध्ये बॉम्बस्फोट, 3 ठार, 13 जण जखमी

पाकिस्तान: पाकिस्तानमधील (Pakistan) कराची शहरामध्ये काल मध्यरात्री बॉम्बस्फोट (bombing) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बॉम्बस्फोटमुळे परिसरातील लोकांमध्ये दहशत (Panic) निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा स्फोट एवढा भयंकर होता की, या स्फोटचा आवाज खूप लांबपर्यंत ऐकू गेला आहे. इतकंच नव्हे, तर या स्फोटमुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या वाहनांचा चक्काचूर झाला आहे.

या बॉम्बस्फोटमुळे कराचीमधील (Karachi) बाजारपेठेत प्रचंड खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटत ३ जणांचा मृत्यू झाला असून १३ हून जास्त लोक जखमी झाले आहेत. या स्फोटमुळे आजूबाजूला उभी असलेल्या वाहने उद्ध्वस्त झाली असून परिसरातील अनेक ठिकाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

खरेतर हा बॉम्ब एका कचराकुंडीच्या बाजूला उभी असलेल्या एका सायकलमध्ये ठेवण्यात आला होता. सूत्रांच्या मते स्फोट झालेल्या या ठिकाणांवरून लोकांना हटवण्यात आले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली आहे. स्फोटाच्या ठिकाणी असलेल्या घरांच्या आणि हॉटेलच्या काचा देखील फुटलेल्या आहेत. पाकिस्तानात सिंध आणि बलुचिस्तानच्या फुट पाडणाऱ्या गटांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे.कराची पोलिस याला दहशतवादी हल्ला म्हणत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

1 thought on “पाकिस्तानातील कराचीमध्ये बॉम्बस्फोट, 3 ठार, 13 जण जखमी

Leave a Reply