पुणे : परदेशी बनावटीच्या मोटार खरेदीसाठी बनावट कागदपत्रांद्वारे ४० लाखांचे कर्ज; बँक व्यवस्थापाकासह चौघांच्या विरोधात गुन्हा

पुणे : परदेशी बनावटीची महागडी मोटार खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रांद्वारे बँक व्यवस्थापकाशी संगनमत करुन ४० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बँक व्यवस्थापकासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन ज्ञानदेव सातपुते (रा. चंदननगर), गजानन ज्ञानेश्वर साकोरे (रा. केंदूर, ता. शिरुर), बँक व्यवस्थापक राहुल लोंढे (रा. विश्रांतवाडी) आणि कुलदीप शर्मा (रा. दत्तवाडी)

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वृषाली गव्हाणे (वय ४०, रा. कोरेगाव भीमा, शिरुर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गव्हाणे यांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. परदेशी बनावटीच्या महागड्या मोटार खरेदीसाठी आरोपींनी गव्हाणे यांच्या पतीच्या नावाने बनावट कागदपत्रांद्वारे बँकेत खाते उघडले. बँक व्यवस्थापक राहुल लोंढे यांनी कागदपत्रांची पडताळणी केली नाही. आरोपी सचिन सातपुतेशी संगनमत केले. गव्हाणे यांच्या पतीच्या नावाने बँकेकडून ४० लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले.

आरोपींनी चंदननगरमधील एका बँकेत खाते उघडले होते. ४० लाखांची रोकड आरोपींनी चंदननगरमधील बँक खात्यात जमा करुन घेतली. या रक्कमेचा वापर मोटार खरेदीसाठी न करतार अपहार केल्याचे गव्हाणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोलांडे तपास करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply