पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:शक्ती परमात्म्याशी जोडल्याने ‎ती शिखरावर घेऊन जाईल‎

आक्रमणात बळाचा वापर केला गेल्यास त्यास शक्ती म्हणतात. आणि‎ती बचावासाठी वापरली जाते तेव्हा तिला सहनशक्ती म्हटले जाते.‎देवाने माणसाला तीन प्रकारची शक्ती दिली आहे: शरीर बल, मनोबल‎आणि आत्मबळ. शारीरिक शक्ती निरोगी राहण्यासाठी, मनोबल‎दुर्गुणांपासून संरक्षणासाठी व शांती मिळविण्यासाठी आत्मबल उपयुक्त‎आहे. सध्या जीवनात तंत्रज्ञान, विज्ञानाचा अतिरेकी वापर होत आहे.‎यामुळे शारीरिक शक्ती कमकुवत होईल. मानसिक शक्तीवरही‎परिणाम होईल. तुम्ही बघा. प्रत्येक व्यक्ती थोडी मानसिक आजारी‎आहे. हे आजार वाढत आहेत. मनोरुग्ण फक्त तुरुंगात, रुग्णालये,‎पागलखान्यात आढळतात असे नाही. तुम्हाला ते आजूबाजूला,‎घरात,कामाच्या ठिकाणी आढळतील.तुम्ही नीट शोध घेतल्यास‎स्वत:मध्येही एक मनोरोगी व्यक्ती दिसतो. पण परमात्म्याने आपल्याला‎तीन शक्ती दिल्या . त्यांचा वापर आपल्यावर अवलंबून आहे. शक्तीचा‎प्रवाह परमात्म्याशी जोडल्याने तो तुम्हाला शिखरावर घेऊन जाईल.‎पण शक्ती चुकीच्या दिशेने वळली तर तुमचे पशूपेक्षाही जास्त पतन‎होईल.

This post was originally published on this site.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *