नाशिक : अल्पवयीन मुलाकडून ४ वर्षीय चिमुकल्याची हत्या; आधारतीर्थ अनाथ आश्रमातील खूनाचा अखेर उलगडा

नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर समोर आली आहे. नाशकात १३ वर्षीय मुलाने ४ वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या आधारतीर्थ आश्रमात एका बालकाचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. याप्रकरणी १३ वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जात असताना अंजनेरी गावाजवळ आधारतीर्थ आश्रम आहे. या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. दोन दिवसांपूर्वी आश्रमात अलोक शिंगारे या ४ वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या मुलाची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता.

या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे प्राथमिकदृष्टया निष्पन्न झालं होतं. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. तसेच आश्रमातील मुलांची, पदाधिकारी, कर्मचारी वर्गाची चौकशी करण्यात येत होती.

दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास करत आश्रमातील १३ वर्षीय मुलाला ताब्यात घेतलं आहे. त्याने आलोखची हत्या का केली? याचा अद्यापही उलगडा झालेला नाही. आश्रमातीलच एका १३ वर्षीय मुलाने ४ वर्षीय बालकाची गळा आवळून हत्या केल्याचं उघड होताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *