नागपुरात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट; हवामान खात्याचा इशारा

नागपूर : नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने नागपूरात पुढील 2 दिवस हिट वेव्ह आणि त्यानंतर 3 दिवस 'सिव्हियर हिट वेव्ह' म्हणजेच प्रचंड उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. नागपूरात गेल्या 4 दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. पारा 44 अंश सेल्सियस पर्यंत पोहचला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उत्तर भारतातील मुख्यत्वे राजस्थान मधून उत्तर-पश्चिम च्या दिशेने येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज पासून नागपूरात पुढील 2 दिवस हिट वेव्ह आणि त्यानंतर 3 दिवस सिव्हियर हिट वेव्ह चा इशारा दिला आहे.

त्यामुळे येणारे 5 दिवस नागपूर उष्ण राहण्याची शक्यता आहे. नागपूर सह अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील तापमानातही वाढ होण्याची शक्यता नागपुर च्या प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी उन्हात 12 ते 4 या वेळेत अनावश्यक घराबाहेर पडू नये, उन्हापासून बचाव करावा, अश्या सूचनाही हवामान विभागाने दिल्या आहेत. नागपुर जिल्हा प्रशासनानेही नागरिकांना उन्हापासून स्वतःचा बचाव करावा आणि सावलीच्या ठिकाणी आधार घ्यावा. आवश्यक असेल तरच संपुर्ण काळजी घेत घराबाहेर निघावे असे आवाहन केले आहे.

उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक विविध शितपेयाचा आधार घेत असून व्यापाऱ्यांनी दुकानात हिरव्या जाळ्यांचे शेड उभारून उन्हापासून बचाव करताना पाहायला मिळत आहेत. घरोघरी नागरिकांनी आपल्या अंगणात सावली आणि थंडावा निर्माण व्हावा यासाठी हिरव्या जाळ्या उभारल्या आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply