नवी दिल्ली : Ukraine Russia War थांबविण्यासाठी PM मोदींनी स्वतःची ओळख वापरली : ऑस्ट्रेलिया

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील युद्ध  आणखीच तीव्र झाले आहे. दोन्ही देशांमधील संघर्ष लवकरच संपुष्टात येईल, अशी सर्व देशांना आशा आहे. भारताने आतापर्यंत रशियन हल्ल्यांबाबत जी भूमिका स्वीकारली आहे ती 'क्वाड'च्या सदस्यांना मान्य असल्याचं ऑस्ट्रेलियानं सांगितलं असून पंतप्रधान मोदींचं देखील कौतुक केलं आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याबाबत 'क्वाड देशांनी भारताची भूमिका मान्य केली आहे. प्रत्येक देशाचे स्वतःचे द्विपक्षीय संबंध आहेत. ते आम्ही समजू शकतो. पण, परराष्ट्र मंत्रालय आणि पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्यांवरून हे स्पष्ट होते की त्यांनी युक्रेनवरील संकट संपविण्याचे आवाहन करण्यासाठी त्यांच्या संपर्काचा वापर केला आहे. त्यांनी युद्ध संपविण्यासाठी स्वतःची ओळख वापरली. यामुळे कोणताही देश नाराज होणार नाही'', असं भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ'फेरेल यांनी पत्रकारांना सांगितले. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिका, जपान, आणि ऑस्ट्रेलियाने रशियाचा तीव्र निषेध नोंदवला. पण, भारताची रशियासोबत जुनी मैत्री आहे. त्यामुळे याबाबत झालेल्या प्रत्येक बैठकीत भारतानं तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. भारताने रशियाविरोधात बोलण्यासाठी अमेरिकेकडून वारंवार भारतावर दबाव टाकला जात आहे. पण, भारत अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ''भारत युक्रेनमधील युद्धाचं समर्थन करत असल्याचा आरोप कोणीही केलेला नाही. तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंनी ६५ वर्षांपूर्वी घालून दिलेल्या धोरणाचे पालन करण्याचा प्रयत्न भारत करत असल्याचे दिसतेय. आज पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन एका कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही देशांमधील शिखर परिषदेमध्ये युक्रेन-रशिया युद्धावर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे.''


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply