नवी दिल्ली : महाराष्ट्राविरोधात गेल्या दहा दिवसांपासून षडयंत्र रचलं जातंय; लोकसभेत सुप्रिया सुळे आक्रमक

नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे  पडसाद आज लोकसभेत उमटले. शिवसेनेचा ठाकरे गट, राष्ट्रवादी संसदेत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सुप्रिया सुळे यांनी सीमावादाच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी त्यांनी आहे.

महाराष्ट्रात गेल्या दहा दिवसांपासून एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्य कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबाबत प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. काल दर हद्दच झाली, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आमचे लोक कर्नाटकात जाऊ पाहत होते. परंतु त्यांना मारहाण केली गेली. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचलं जात आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.भारत देश एक आहे आणि देशात हे चालणार नाही. मी अमित शाह यांना विनंती करेन की त्यांनी यावर काहीतरी बोलावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

महाराष्ट्राच्या खासदारांनी लोकसभेत कर्नाटक सरकार कृतीबाबत तीव्र भूमिका घेतली. यावेळी कर्नाटकच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेत गदारोळ केला. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या विरोधक अडचणीत आल्यावर हा मुद्दा उचलला जात असल्याचा दावा कर्नाटकच्या खासदारांनी केला.

दम असेल तर इकडे येऊन दाखवा, कन्नड रक्षण वेदिकेचं आव्हान

आज कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेने बेळगावात महाराष्ट्राविरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात त्यांनी महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. इतकंच नाही तर, त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देखील दिलं. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार आहे. पण त्यांच्यात दम नाही, असं कन्नड रक्षण वेदिकेने म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील लोकांमध्ये दम असेल तर इकडे येऊन दाखवावं, नाहीतर आम्ही लाखोंच्या संख्येने तिथे येतो, आणि काय करू शकतो ते दाखवतो, असं थेट आव्हानच कन्नड रक्षण वेदिकेने दिलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply