धुळे : तिहेरी अपघातात ३ ठार, ६ गंभीर जखमी; लग्न साेहळ्यास पुण्याला निघाली हाेती CAR

धुळे : धुळे शहरापासून सुमारे ३० किलाेमीटर अंतरावर असलेल्या पुरमेपाडा (मुंबई- आग्रा महामार्गावर) झालेल्या अपघातात तीन जण ठार तस सहा जण जखमी झाले आहेत. ट्रक, रिक्षा आणि चार चाकी या तीन वाहनांचा रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. या तिहेरी अपघातामधील रिक्षा चालक हा ट्रकखाली खूप वेळ तसाच अडकून पडला हाेता. त्याला क्रेनच्या सहाय्याने काढण्यासाठी पोलीस प्रशासनाने अथक परिश्रम घेतले. या अपघातामधील जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने अपघातामधील मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या अपघातामधील चार चाकीतील लाेक लग्न समारंभासाठी तरडी या गावातून पुण्याला जात हाेते अशी प्राथमिक माहिती पाेलीसांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply