तुळजापूर : दोन वर्षानंतर तुळजापुरात भाविकांच्या उपस्थितीत उभारली गुढी

तुळजापूर - तब्बल दोन वर्षांनंतर तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा भक्तांसोबत साजरा करण्यात आला. मंदिराच्या मुख्य कळसाखाली आज पहाटेच्या सुमारास गुढी उभारण्यात आली. त्यानंतर देवीचा अभिषेक करण्यात आला. मूर्तीला सर्वोत्कृष्ट शिवकालीन दागिन्यांचा पेहराव घालण्यात आला. मंदिरात पारंपरिक पद्धतीने, विविध कार्यक्रमांनी गुढीपाडवा साजरा करण्यात येतो.

गेली दोन वर्ष कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी भाविकांना मंदिरात प्रवेश बंद होता. मात्र आता भाविकांना प्रवेश मिळतो आहे. आज गुढी उभारण्यात आली. नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुळजाभवानी मातेचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर देवीला महावस्त्राचा पेहराव घातला सकाळी 5 वाजताच्या दरम्यान महंतांच्या उपस्थितीत गुढी उभी करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply