डोंबिवली : ‘ते’ राजीनामे गैरसमजातून; शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मागे

डोंबिवली : शिवसेना डोंबिवली ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याची बातमी आल्यानंतर आता डोंबिवली ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांनी एक पाऊल मागे घेत सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे मागे घेतले आहेत.

 डोंबिवली ग्रामीण विभागातील 27 गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत संपूर्ण प्रकार हा गैरसमजातून झाल्याचे मान्य करण्यात आले, येणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून डोंबिवली शहरालगत असलेल्या डोंबिवली ग्रामीण शिवसेना विभागाचा फक्त प्रशासकीय कारभार हा शिवसेना मध्यवर्ती शाखेतून होईल अशी भूमिका जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी मांडल्यामुळे आमच्या पदाचे अधिकार अबाधित असून चुकून आमचा गैरसमज झाल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे आणि  उपस्थित इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. शिवसेनेचे सर्व डोंबिवली ग्रामीण मधील पदाधिकारी पूर्वीप्रमाणेच जोमाने काम करतील अशी ग्वाही वरिष्ठांना देण्यात आली.

२७ गावांचा समावेश महापालिकेत करण्यात आल्यानंतर आता शिवसेनेकडूनदेखील प्रशासकीय सोयीचे कारण देत डोंबिवली ग्रामीणचा समावेश डोंबिवली शहर शाखेत करण्याचे आदेश जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी काढले आहेत. या आदेशानंतर नाराज झालेल्या डोंबिवली ग्रामीणच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.तर, राजीनामे देणारे बहुतांशी माजी आमदार सुभाष भोईर यांचे समर्थक असल्याचे शिवसैनिकाकडून सांगितले जात आहे.मात्र या प्रकरणावर कोणीही बोलायला तयार नाही आहेत...

या आदेशानुसार डोंबिवली शहर व डोंबिवली ग्रामिण विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांस सुचित करण्यात येते की, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी डोंबिवली ग्रामिण विभागातील सर्व गावांचा समावेश प्रशासकीय कामाच्या सोयीकरीता डोंबिवली शहर शाखेच्या माध्यमातून आज दि.१९/०४/२०२२ पासून कामकाज सुरु करण्यांत येत आहे.

आपले दि.19/4/2022 रोजीचे परिपत्रक मिळाले. सदर परिपत्रकानुसार डोंबिवली ग्रामिण मधिल पक्ष संघटनेचा प्रशासकीय कामकाज पत्राच्या तारखेपासुन डोंबिवली शहर शाखेमधुन होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासुन ग्रामिण विभागातील पक्षाचे काम ग्रामिणच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत चालत होता. प्रत्येक विभागातील पदाधिकारी प्रमाणिकपणे आपल्यावरील जबाबदारी निभावत होते. दि.19/4/2022 च्या आपल्या परीपत्रकानुसार पुढे आमच्यावर कोणतीच जबाबदारी नाही हे स्पष्ट आहे. त्या कारणाने कोणतीच जबाबदारी नसेल तर त्या पदांना काही अर्थ नाही म्हणुन आम्ही स्वखुशिने आमच्यावर असलेल्या पक्षाच्या पदांच राजीनामा देत आहे. आपण आजपर्यंत आम्हा सर्वांवर जी जबाबदारी दिलीत. आमच्या कुवतीनुसार आम्ही ती पार पाडण्याचा प्रयत्न केला. कामच्या ओघात काही चुका झाल्या असतील तर त्या पोटात घ्यावी ही आमची नम्र विनंती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply