डीप फ्राय केलेल्या पदार्थांमध्ये जास्त तेल राहतंय? तर फॉलो करा शेफ संजीव कपूर यांनी शेअर केलेल्या 'या' ट्रिक्सImage Credit source: Getty Images
भजी असो वा कटलेट आपण जेव्हा हे खास पदार्थ बनवतो तेव्हा आपल्या हातावर, प्लेट्सवर जास्त तेल जाणवते. यामुळे बरेचजण तळलेले पदार्थ खाणे टाळतात. शिवाय जास्त तेलकट पदार्थ खाणे देखील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात या अनुषंगाने अनेकजण डीप फ्राइंगचे पदार्थ खात नाही. पण याच समस्येवर मात करण्यासाठी डीप फ्राय केलेले पदार्थ योग्यरित्या आणि योग्य ट्रिक्सने बनवल्यास ते उत्तम चव देतात. तर प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी काही सोप्या ट्रिक्स सांगितल्या आहेत ज्या फॉलो केल्यास समोसे, पकोडे किंवा फ्रेंच फ्राईज असो डीप फ्राय केल्यास त्यामध्ये जास्त तेल राहणार नाही.
जर डीप फ्राय पदार्थांमध्ये जास्त तेल राहत असेल तर आजच्या लेखात आपण शेफ संजीव कपूर यांनी डीप फ्राइंगच्या काही बेस्ट टिप्स शेअर केल्या आहेत. या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स तुमच्या फ्राईड पदार्थांना उत्तम चव देण्यासाठी मदत करतील. चला जाणून घेऊयात त्या टिप्स.
योग्य तेलाचा वापर करणे
जेव्हा आपण डीप फ्राइंग करतो तेव्हा योग्य तेल निवडल्याने पदार्थ तळताना त्यावर खूप फरक पडतो. शेफ संजीव यांच्या मते कोणताही पदार्थ डीप फ्राय तळण्यासाठी सामान्य चव असलेले तेल निवडणे चांगले. तर पश्चिम बंगालमध्ये मोहरीचे तेल जास्त वापर करतात. कारण या तेलाचे गुणधर्म त्याचे आरोग्य फायदे खूप आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या पदार्थांनुसार योग्य तेल निवडा.
तेलाचे योग्य तापमान
जेव्हा तुम्ही कच्चे किंवा कोमट झालेल्या तेलात पदार्थ टाकतात, तेव्हा तो पदार्थ तेल लगेच शोषून घेण्यास सुरुवात करतात. त्याआधी तेल नेहमीच पूर्णपणे गरम होऊ द्या आणि त्यानंतर त्यात पदार्थ टाकून तळा. अशाने तेलात टाकलेला पदार्थ तेलातून लवकर वर येईल आणि कमी तेल शोषले जाईल.
पॅनमध्ये जास्त गर्दी करू नका –
तुम्ही जर समोसे, पकोडे किंवा फ्रेंच फ्राईज सारखे काही पदार्थ तळत असाल तर एकाच वेळी जास्त प्रमाणात तळू नका. यामुळे तेलाचे तापमान कमी होते, ज्यामुळे तळणे कठीण आणि चिकट होते. ज्यामुळे हे पदार्थ कुरकुरीत होत नाही.
तळताना वारंवार ढवळणे टाळा – काही लोकं पुऱ्या व भजी तळताना तो पदार्थ तेलात वारंवार ढवळत राहतात. तर असे न करता पुऱ्या असो इतर कोणता डीप फ्राय पदार्थ तेलात सेट होऊ द्या त्यानंतर हलक्या हाताने दुसऱ्या बाजूने उलटवा जेणेकरून पदार्थ दोन्ही बाजूंनी समान तळले जातील.
तळण्यापूर्वी जास्तीचे ब्रेडक्रंब किंवा रव्याचा वापर टाळा
आपण अनेकदा तळलेला पदार्थ पुर्णपणे कुरकुरीत होण्यासाठी त्यावर वरून ब्रेडक्रंब किंवा रव्याचा वापर करतो. पण अनेकदा हे वरील पदार्थ तेलात जमा होतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तळण्यापूर्वी तो पदार्थ व्यवस्थित कॉर्न स्टार्च मध्ये बुडवा आणि जास्तीचे ब्रेंडक्रंब लावणे टाळा. यामुळे तेल फुटणार नाही आणि पदार्थ कुरकुरीत राहतील.
तेलाचे तापमान कसे तपासायचे: तेलाचे तापमान तपासण्यासाठी, तुम्ही जो पदार्थ तळत आहात त्यांचा काहीसा छोटा तुकडा घ्या आणि तेलात टाका. जर तो तुकडा तेलात टाकल्या टाकल्या वरच्या बाजूला तरंगत असेल तर तेल पुरेसे गरम झालेले आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

