टिटवाळा : बॅग उघडताच पाेलीस चक्रावले; 1.71 कोटीची सोन्याची बिस्किटं, बेहिशोबी रक्कमेसह एकास घेतलं ताब्यात

टिटवाळा रेल्वे स्टेशमध्ये तब्बल एक कोटी 71 लाखाचा मुद्देमाल (रोख रक्कम आणि सोने) पकडण्यात टिटवाळा आरपीएफला यश आले आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

शनिवारी (ता. एक ऑक्टोबर) ​​पुष्पक एक्स्प्रेसमधून टिटवाळा प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती संशयास्पदरित्या खाली उतरली. त्यावेळी रेल्वे आरपीएफचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल एल.बी.वाघ आणि एमएसएफ कर्मचारी शुभम खरे यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याची चाैकशी सुरु केली. त्यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तर दिली.

त्यामुळं पाेलिसांचा संशय बळावला. पाेलीसांनी संबंधितास पुढील चौकशीसाठी आरपीएफ टिटवाळा कार्यालय येथे आणले. रेल्वे आरपीएफच्या महिला इन्स्पेक्टर टिटवाळा अंजनी बाबर यांनी त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता एक धक्कादायक माहिती समाेर आली.

संबंंधिताकडे रोख रक्कम किंवा सोन्याची माहितीबाबत कोणतीच कागदपत्र अथवा स्पष्टता नसल्यामुळे आरपीएफ पोलिसांनी आयकर अधिकाऱ्यांना माहिती देऊन पुढील कारवाईसाठी अहवाल पाठवला. संबंधित संशयित आराेपीचे नाव जीपी मोंडल असून ताे कामोटे (नवी मुंबई) येथे वास्तव्यास असल्याचे त्याने सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply