जालना : आठ किलो गांजा जप्‍त; स्थानिक गुन्‍हे शाखेची रेल्‍वे स्‍टेशन परिसरात कारवाई

जालना : रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विक्रीची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी कारवाई करत आठ किलो गांजा जप्त करत दोन लाखाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे.

जालना शहरातील कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात काही जण दुचाकीवरून गांजा विक्री करत असल्याच्या माहिती मिळाली होती. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळ असलेला आठ किलो गांजा दुचाकी असा अंदाजे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
पथकातील पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात साफळा रचत दुचाकीवरून दोन संशयित तरुण पोत्यात काही तरी नेत असल्याचे लक्षात आले. यानंतर पथकातील पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांच्याजवळ तब्बल आठ किलो गांजा आढळून आला. दुचाकीसह दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करत आरोपी विरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगून त्यांची अवैधरित्या विक्री करण्याचा प्रयन्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *