जम्मू: किती काश्मिरी पंडितांना खोरे सोडावं लागलं? गृहमंत्रालयाच्या अहवालातून आकडेवारी समोर

जम्मू: पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला जवळपास ६४,८२७ काश्मिरी पंडितांनाकाश्मिर खोरे सोडून जम्मू, दिल्ली आणि देशाच्या काही भागात स्थायिक व्हावे लागले होते. अशी माहिती केंद्राच्या गृह मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. (MHA) २०२०-२१ च्या वार्षिक अहवालानुसार, १९९० ते २०२० दरम्यान जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादामुळे १४,०९१ नागरिक आणि ५,३५६ सुरक्षा दलाच्या जवानांना आपला जीव गमावावा लागला होता अशी माहितीही या अहवालात आहे.

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा संबंध सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवाद्यांच्या घुसखोरीशी असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शिवाय काश्मिरी पंडितांव्यतिरिक्त, काही शीख आणि मुस्लिम (Sikhs and Muslims) कुटुंबांनाही दहशतवादामुळे काश्मीर खोऱ्यातून जम्मू, दिल्ली आणि देशाच्या इतर भागांमध्ये स्थलांतर करण्यास भाग पाडले होते. अहवालानुसार जम्मूच्या डोंगराळ भागातील जवळपास १.०५४ कुटुंबांचे जम्मूच्या मैदानी भागात स्थलांतर झालं होते.

पंतप्रधान विकास पॅकेज योजनेत म्हंटल आहे की, मदत आणि स्थलांतरित आयुक्त, जम्मू आणि काश्मीर यांच्याकडे उपलब्ध नोंदीनुसार, सध्या ४३,६१८ नोंदणीकृत काश्मिरी स्थलांतरित कुटुंबे जम्मूमध्ये, १९,३३८ दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मध्ये आणि १,९९५ देशात स्थायिक आहेत. तर काही इतर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थायिक आहेत. काश्मिरी स्थलांतरितांचे खोऱ्यात पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने, गृह मंत्रालयाने पंतप्रधान पुनर्निर्माण पॅकेज योजना २०००८ अंतर्गत जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये 3 हजार नोकऱ्या आणि पंतप्रधानांच्या अंतर्गत ३ हजार नोकऱ्या मंजूर केल्या आहेत.

दरम्यान, गृह मंत्रालयाच्या अहवालामुसार २०१४ ते २०२२ या कालावधीत जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत एकूण २,५४६ दहशतवादी कारवाया झाल्या, ज्यामध्ये ४८१ सुरक्षा कर्मचारी, २१५ नागरिक आणि १,२१६ दहशतवादी मारले गेल्याचं म्हंटल आहे. तर की २०१४ ते २०२२ दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये सीमेपलीकडून १,७७६ घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply