HSC Exam : सध्या संपूर्ण राज्यात इयत्ता बारावीच्या परीक्षा चालू आहेत. या परीक्षांदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. इयत्ता बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची असते. येथूनच विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळते. या काळात आई-वडिलांचा चांगला पाठिंबा असेल तर विद्यार्थी सकारात्मकतेने परीक्षेला सामोरे जातात आणि चांगले यश मिळवतात. सध्या मात्र भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे हृदय पिळवटून टाकणारा प्रकार समोर आला आहे. येथे वडिलांचे पार्थीव घराबाहेर पडलेले असताना एका विद्यार्थिनीने अश्रू आवरत इंग्रजी विषयाचा पेपर दिला आहे. शिक्षण थांबू नये म्हणून, वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे म्हणून घरावर शोककळा पसरलेली असताना या विद्यार्थिनीने इयत्ता बारावीचा पेपर दिला आहे.
वडील गेल्याचे दु:ख, मुलगी जड अंत: करणाने पेपरला
हदय हेलावून टाकणारी ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आंबागड या गावातील आहे. वडिलांचा मृत्यू झालेला असताना पेपरला जाण्याची वेळ या विद्यार्थिनीवर आली आहे. या विद्यार्थिनीचे नाव जान्हवी हौशीलाल राहांगडाले असेआहे. सर्वात मोठं दु:ख झालेलं असतानाही अशा कठीण प्रसंगात या लेकीने अश्रूंना आवर घालत पेपर दिला आहे. हातात पेन घेऊन ती इंग्रजीचा पेपर लिहायला बसली. तिची ही कहाणी ऐकून अनेकांना अश्रब अनावर झाले आहेत.
वडिलांच्या डोक्याला झाली होती दुखापत
मिळालेल्या माहितीनुसार जान्हवीचे वडील हौशीलाल राहांगडाले (५१) सायकलने घरी परतत असताना अचानक तोल जाऊन खाली कोसळले. डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि काही वेळातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्षणात त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचे आभाळ कोसळले. घरातील आधारवड हरपला. परंतु नियतीचा क्रूर खेळ इथेच थांबला नाही. दुसऱ्याच दिवशी जान्हवीचा बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर होता. जान्हवी ही जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, तुमसर येथील विद्यार्थिनी आहे. आयुष्याच्या टर्निंग पॉइंटवर उभी असलेली ही मुलगी एका क्षणात पितृछत्र हरपून बसली. पण तरीदेखील वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती परीक्षा केंद्रात गेली आणि मामाच्या मुलासोबत पेपर दिला. तिच्या या जिद्दीला आता राज्यभरातून सलाम केला जात आहे.
शहर
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
महाराष्ट्र
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

