खेड-शिवापूर टोलनाक्याच्या दरात 8 टक्के वाढ

खेड-शिवापूर - पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे 8 टक्के टोलवाढ करण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्यापासून ही टोल दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात टोलचे दर बदलले जातात. त्यानुसार यावर्षीही टोलचे दर एप्रिल महिन्यापासून बदलले असून टोलच्या दरात सुमारे 8 टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठीच्या टोलच्या दरात 10 रुपयांची वाढ झाली असून नवीन दरानुसार या वाहनांना 110 रुपये टोल द्यावा लागणार आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या टोलच्या दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे. या वाहनांना आता 175 रुपये टोल आकारला जाणार आहे. बस आणि ट्रकसाठी पूर्वी 325 रुपये टोल दर होता. त्यात 45 रुपयांची वाढ झाली असून आता बस आणि ट्रकसाठी 370 रुपये टोल आकारण्यात येणार आहे.

जड वाहनांसाठी पूर्वी 525 रुपये टोल होता. आता त्यात 60 रुपयांची वाढ झाली असून जड वाहनांना आता 585 रुपये टोल द्यावा लागणार आहे. अवजड वाहनांच्या टोल दरात 70 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या टोल दरानुसार अवजड वाहनांसाठी 710 रुपये टोल आकारण्यात येणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply