नवी दिल्ली : जून 2021 मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर शहरी भागात बेरोजगारी वाढल्याचे भारत सरकारने मान्य केले आहे. यामुळे 2020 च्या तुलनेत सुधारत असलेली रोजगाराची स्थिती पुन्हा बिघडली आहे. एनएसओच्या सांख्यिकी विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. NSO च्या पीरियडिक लेबर फोर्स सर्व्हे (PLFS) च्या त्रैमासिक बुलेटिनमध्ये (एप्रिल-जून 2021) आकडेवारी प्रकाशित केली आहे. सर्वेक्षणात देशातील शहरी भागातील 43,892 शहरी कुटुंबांचा समावेश करण्यात आला होता. ज्यांची संख्या 1,70,187 इतकी होती. (Unemployment Rate In India)
यासोबतच सरकारने कोविड दरम्यान, विशेषत: पर्यटन क्षेत्रातील गमावलेल्या नोकऱ्यांचा वेगळा आकडा जाहीर केला आहे. लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, कोविड दरम्यान 2020 पासून आतापर्यंत एकूण 2.15 कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या असून, महामारीच्या पहिल्या लाटेत 1.45 कोटी लोकांनी, दुसऱ्या लाटेत 52 लाख आणि तिसऱ्या लाटेत 18 लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्याचे सरकारचे मत आहे.
प्रकाशित आकडेवारीनुसार 2021 मध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान देशातील एकूण बेरोजगारीचा दर 9.4 टक्के होता, परंतु एप्रिल ते जून या कालावधीत बेरोजगारीचा दर 12.7 टक्के झाला. एप्रिल-जून 2020 च्या तिमाहीत हा दर 20.9 टक्के होता. या सर्व परिस्थितीमध्ये पुरुषांपेक्षा महिलांमध्ये बेरोजगारीची मोठी समस्या असल्याचे दिसून आले आहे.
जानेवारी-मार्च 2021 तिमाहीत पुरुषांमधील बेरोजगारीचा दर 8.7 होता. परंतु एप्रिल-जून 2021 तिमाहीत तो 12.2 पर्यंत वाढला. त्या तुलनेत महिलांमधील बेरोजगारीचा दर 11.8 वरून 14.3 पर्यंत वाढला आहे. त्याचप्रमाणे, कामगार दल सहभाग दर (LFPR) 57.5 टक्क्यांवरून 57.3 टक्क्यांवर आला आहे. LFPR म्हणजे एकूण लोकसंख्येतील लोकांचे प्रमाण जे एकतर एखाद्या रोजगारात आहेत किंवा एखाद्या रोजगारासाठी इच्छुक आहेत. त्यात नोकरदार आणि बेरोजगार दोघांचाही समावेश आहे. एप्रिल-जून 2020 या तिमाहीत हा दर 55.5 टक्के होता. याच काळात, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर (WZWJ) किंवा UPR 52.5 टक्क्यांवरून 50.3 टक्क्यांवर घसरले आहे. UPR ची व्याख्या नोकरीत असलेल्या व्यक्तींची टक्केवारी म्हणून केली जाते.हे पण वाचा-
शहर
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
महाराष्ट्र
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
गुन्हा
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा























Subscribe to my channel



