कोथरूडची वाहतूक कोंडी फुटणार; सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर विकास आराखडा मंजूर

पुणे : कोथरुड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. रस्ता लवकरच तयार होऊन कोथरूडकरांची वाहतूककोंडीच्या त्रासातून मुक्तता होणार आहे.

कोथरूड मधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यासाठी विविध पर्याय महापालिकेच्या माध्यमातून ठेवण्यात आले होते. त्यातील सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी सातत्याने होत होती. मात्र, रस्त्याच्या कामात अनेक अडथळे होते. या मार्गावरील बहुतांश जागा ही किर्लोस्कर कमिन्सच्या मालकीची असल्याने, जमीन अधिग्रहणाचा मोठा प्रश्न होता. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे.  

सिद्धार्थ पॅलेस ते मृत्यूंजयेश्वर मंदिरच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. हा रस्ता किर्लोस्कर कमिन्सच्या मदतीने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यास येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण होऊन तो २० मीटर रूंदीचा होणार आहे. त्यासाठी १५ कोटी खर्च अपेक्षित आहे. जुलै २०२३ पर्यंत  रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे बांधकाम विभागाचे नियोजन आहे. यामुळे  मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply