केरळमध्ये शिक्षकाकडून ६० पेक्षा अधिक मुलीचे लैंगिक शोषण; निवृत्तीनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

केरळमध्ये एका शिक्षकाने तीस वर्षांत ६० हून अधिक विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. के व्ही शशीकुमार असे त्या शिक्षकाचे नाव आहे.

५० हून अधिक विद्यार्थिनींनीची तक्रार के व्ही शशीकुमार सेंट जेम्मास या मुलींच्या शाळेत शिकवत होता. त्यावेळी त्याने अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. मार्च २०२२ मध्ये तो निवृत्त झाला. ५० हून अधिक विद्यार्थिनींनी या शिक्षकाविरोधात तक्रार दिली आहे. हा शिक्षक मलप्पुरम नगरपरिषदेचा सदस्यही आहे. आपल्या निवृत्तीची पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यानंतर त्याच्यावर एका माजी विद्यार्थिनीने #MeToo अंतर्गत लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते.

शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या म्हणण्यानुसार, काही विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये शशिकुमार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. परंतू, शाळा व्यवस्थापनाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. माजी विद्यार्थी संघटनेने मलप्पुरम जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांनी सार्वजनिक शिक्षण संचालक बाबू के आयएएस यांना शाळा व्यवस्थापनाची चौकशी करण्याचे आणि लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply