केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे शनिवारी सायंकाळी सीमा सुरक्षा दलाच्या विशेष विमानाने लोहगाव  विमानतळ येथे आगमन झाले. त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार चंद्रशेखर बावनकुळे होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शहा यांचे स्वागत केले.

यावेळी खासदार प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री पंकजा मुंडे, महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सीआरपीएफचे सहायक कमांडट सुबोध कुमार आदी उपस्थित होते. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आगमन झाले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्यांचे स्वागत केले.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *