औरंगाबाद हादरलं! आईच्या सांगण्यावरूण पतीनं केली पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाची हत्या

औरंगाबाद शहर दुहेरी हत्याकांडाने हदरलं आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून नवऱ्याने पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने औरंगाबाद जिल्हात खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार औरंगाबादमधील सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के दांपत्य राहत होते. यामध्ये अडीच वर्षांचा मुलगा पत्नी आणि आरोपीची आई एकत्र राहत होते.

मात्र आरोपी पति आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. या कारणावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद देखील झाले होते. दरम्यान काल रात्री या पति पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. यानंतर समीर मस्के यांने मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आणि मुलगा निशात यांची गळा आवळून हत्या केली.

दरम्यान औरंगाबाद मधील सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याआला आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर आरोपी समीर मस्के याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुख्य म्हणजे आरोपी समीरच्या आईनेच आपल्याला या दोघांची हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप मृत आरतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. दरम्यान पुढील तपास पोलिस करत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply