औरंगाबाद : नाशिकजवळील अपघातामुळे मराठवाड्यात रेल्वेसेवेवर परिणाम

औरंगाबाद : दौलताबाद येथे रेल्वे घसरल्याच्या घटनेला चोवीस तास उलटत नाही, तोच रविवारी (ता.३) पुन्हा नाशिक जवळ पुन्हा रेल्वे रुळावरून घसरली. त्यामुळे मराठवाड्याच्या रेल्वेसेवेवर विपरीत परिणाम झाला. यामुळे चार रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या तर चार रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या. दौलताबाद येथे शनिवारी (ता.२) रेल्वे मालगाडी (प्लॅट कंटेनर) रुळावरून घसरल्याने रेल्वेसेवेवर परिणाम झाला होता. त्यानंतर रविवारी (ता.३) पुन्हा मध्य रेल्वेमधील इगतपुरी ते भुसावळ सेक्शनमध्ये जयनगर एक्सप्रेस ही रेल्वे देवळाली कॅम्प नजीक रेल्वे घसरल्याची घटना घडली. यामुळे मराठवाड्याच्या रेल्वेसेवेवर विपरीत परिणाम झाला आहे.

रद्द झालेल्या रेल्वे

मुंबई ते आदिलाबाद (रेल्वे क्र. ११४०१), मुंबई ते सिकंदराबाद (क्र. १७०५७), मुंबई नांदेड (क्र. १७६१२), नांदेड ते मुंबई (क्र. १७६११) या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अंशतः रद्द झालेल्या रेल्वे

-आदिलाबाद ते मुंबई (क्र. ११४०२) ही औरंगाबाद ते मुंबई दरम्यान रद्द करण्यात आली. तर सिकंदराबाद मुंबई (क्र. १७०५८) ही रेल्वे औरंगाबाद मुंबई दरम्यान रद्द करण्यात आली. नांदेड मुंबई (क्र. १७६१८) ही मनमाड मुंबई दरम्यान रद्द करण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई ते नांदेड (क्र. १७६१७) ही मुंबई ते मनमाड दम्यान रद्द करण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply