औरंगाबाद : घरबसल्या भरा मालमत्ता कर, पाणीपट्टी

औरंगाबाद : मालमत्ता कर, पाणीपट्टी भरण्यासाठी अनेक मालमत्ताधारक वॉर्ड कार्यालयात येतात. मात्र आता त्यांना घरी बसून, कराची रक्कम भरता येणार आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने ई-गव्हर्नन्स अंतर्गत नव्या आर्थिक वर्षापासून मोबाईलवर मेसेजची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याव्दारे नागरिकांना विविध सुविधा मिळणार आहे. ई-गव्हर्नन्स अंतर्गत शहरातील मालत्ताधारकांचे मोबाईल नंबर लिंक करण्याचे काम काही महिन्यांपासून सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाच एप्रिलपासून नागरिकांना विविध डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतला आहे. नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी मेसेज येईल. यासाठी स्मार्टसिटीने https://www.aurangabadmahapalika.org/ हे पोर्टल लाँच केले आहे. या पोर्टलअंतर्गत नागरिकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक पेमेंट गेटवे लिंक येईल. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना आपली घरपट्टी व पाणीपट्टी किती आहे, ती रक्कम दिसेल. याच लिंक वरून नागरिकांना युपीआय व क्यूआरद्वारे बिल भरणे सहज शक्य होईल. यामुळे नागरिकांना वॉर्ड कार्यालयात चकरा मारण्याची गरज भासणार नाही, असे स्मार्ट सिटीचे प्रकल्प अभियंता फैज अली यांनी सांगिते.  या सुविधेमुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल. घरबसल्या सहज आणि सुलभ पद्धतीने कर भरणे शक्य होईल. तसेच पोर्टल वरून नागरिक महापालिकेशी निगडीत तक्रारीही नोंदवता येतील, या तक्रारींचे वेळेवर निवारण करता येईल, यंत्रणा तयार करण्यात आल्याचे फैज यांनी नमूद केले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply