औरंगाबाद : ‘आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज आले पाहीजे; हीच खरी मराठेशाही ठरेल’ : राज ठाकरे

औरंगाबाद : आमच्या लोकांच्या अंगामध्ये देवी येते व भूतं येते. मात्र, ज्या दिवशी आमच्या देशातील लोकांच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज आले त्या दिवशी अख्ख जग जिंकून टाकू, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यांचे म्हणणे खरे आहे. आमच्या अंगात शिवाजी महाराज आले पाहीजे. हीच खरी मराठेशाही ठरेल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

स्वाभिमानाने कसं जगायचं असते आणि काय जगायचं असते हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू १६८० मध्ये झाला. यानंतर औरंगजेब महाराष्ट्रात आला. त्याला माहिती नव्हत का? शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आहे. त्याला माहिती होते. तरी तो आला. २७ वर्षे येथे थांबला आणि १७०७ मध्ये मरण पावला. त्याने आपल्या पत्रांमध्ये ‘शिवाजी अजून मला छळतोय’ असे लिहायचा, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

तो प्रेरणेला छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होता. कारण, छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर प्रेरणा आहे. त्याचे विचार व प्रेरणा कधीही संपणार नाही. शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनेच औरंगजेबाला छळले. त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही. मात्र, आता नेत्यांमुळे महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली जात आहे. याला राजकारण म्हणतात, असेही राज ठाकरे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply