रुग्णालयात दाखल केलेल्या माझ्या एका नातेवाइकाला कधी डिस्चार्ज मिळेल, असा प्रश्न मी बुधवारी डॉक्टरांना विचारला. डॉक्टर म्हणाले, एवढी घाई का? मी म्हणालो, घाई नाही, पण मला गुरुवार आणि शुक्रवारी माझ्या काकांच्या 80 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे. सुशिक्षित व्यक्ती एखाद्याच्या आजारापेक्षा उत्सवाला प्राधान्य देत आहे, अशा नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिले. मग आपण 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे इतक्या थाटामाटात का साजरे करतो, हे त्यांना स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. हे आकडे आध्यात्मिक आहेत की केवळ सांस्कृतिक परंपरा आहेत, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्याचे उत्तर महाभारतातील राजा ययातीच्या कथेत आहे. ययातीने जीवन पूर्णत्वाने जगले - सत्ता, सुख, यश आणि सर्वकाही. पण अचानक वृद्धत्वाची सुरुवात झाल्याने त्याला धक्का बसला. खोलवर आत्मपरीक्षण केल्यानंतर त्याला जाणवले की “सुखाला मर्यादा असतात, पण इच्छा कधीच संपत नाहीत.’ ही गोष्ट उमगल्यानंतर ययातीचे जीवन बदलले. त्यांनी म्हातारपण स्वीकारले. स्पष्ट केले की जीवनात पाच अंतर्गत वळणे असतात - ती वयावर नव्हे तर शहाणपणावर आधारित असतात. ही वळणे 60, 70, 80, 90 आणि 100 वर्षे वयाच्या भारतीय परंपरांशी संबंधी आहेत. त्यांची व्याख्या खालीलप्रमाणे आहे- 60 व्या वर्षी षष्ट्यब्दीपूर्ती : 60 व्या वर्षी काहीतरी बदलते - शरीरात नाही तर प्राधान्यक्रमांमध्ये. “मी आणखी किती साध्य करू शकतो?’ हा प्रश्न नाहीसा होऊ लागतो. त्याच्या जागी प्रश्न येतो, “आता खरोखर काय महत्त्वाचे आहे?’ तुमचे मन संचयातून समजून घेण्याकडे जाते. आत्ममंथन सुरू होते. आता आवाज, प्रशंसा किंवा बाह्य प्रमाणीकरणाची गरज नाही. शोध स्पष्टतेचा आहे. ही कमकुवतपणा नाही तर महत्त्वाकांक्षेसह येणारी परिपक्वता आहे. 70 व्या वर्षी भीमरथ शांती : स्वतःला बरोबर सिद्ध करण्यापेक्षा शांतता अधिक शक्तिशाली वाटते. तुम्ही लगेच प्रतिक्रिया देत नाही. युक्तिवाद आकर्षक वाटत नाहीत. युक्तिवाद जिंकण्यापेक्षा नातेसंबंध जपणे अधिक महत्त्वाचे बनते. असे दिसते की शांत राहणे बरोबर असण्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. 80 व्या वर्षी शताभिषेकम : तुमची केवळ उपस्थिती सांत्वन देते. 80 व्या वर्षी लोक सल्ला घेण्यासाठी येत नाहीत. ते काहीतरी खोलवर शोधतात - जीवन जगता येते आणि समजून घेतले जाऊ शकते याची खात्री. या वयात तुमची उपस्थिती स्वतःच एक आशीर्वाद बनते. शब्दांची गरज नसते. तुमची उपस्थितीच सांगते की सर्वकाही ठीक आहे. म्हणूनच वयाचा ऐंशीचा टप्पा पवित्र मानला जातो. 90 व्या वर्षी नवती : येथे काहीतरी दुर्मिळ घडते. अहंकार नाहीसा होतो. तुम्हाला इतरांना सुधारण्याची इच्छा होत नाही. तुम्ही तुमच्या मतांना चिकटून राहत नाही. गोष्टी वैयक्तिकरीत्या घेतल्या जात नाहीत. तुम्ही सहज दुखावत नाही. हे कमकुवतपणामुळे नाही तर जीवनाने तुम्हाला खूप काही दाखवले आहे म्हणून होते. तुम्ही क्षुल्लक गोष्टींवर ऊर्जा वाया घालवत नाही. एक शांत-स्थैर्य येते. ही नम्रताच खरे अध्यात्म आहे. 100 व्या वर्षी शतमानम : जीवन वैयक्तिक कथांच्या पलीकडे जाते. वयाची शंभरी गाठणे ही केवळ वर्षांची संख्या नाही तर एक टप्पा आहे. तेथे व्यापक चित्र दृश्यमान होते. तुम्हाला जाणवते की तुम्ही वाहून घेतलेल्या चिंता अनावश्यक होत्या. तुम्ही दिलेले प्रेम खरोखर महत्त्वाचे होते. आयुष्य नेहमीच एका गूढ, करुणामय शक्तीने चालत आले आहे. 100 व्या वर्षी व्यक्ती कमी पण त्याची उपस्थिती जास्त जाणवू लागते. या पाच टप्प्यांचे सार आपल्या ऋषी आणि पूर्वजांच्या जीवनात दिसून येते. त्यांनी वय नाही तर वयानुसार येणारे बदल साजरे केले. 60 व्या वर्षी प्राधान्यक्रम बदलतात. 70 व्या वर्षी शांती शक्ती बनते. 80 व्या वर्षी उपस्थिती समाधान देते. 90 व्या वर्षी अहंकार नाहीसा होतो. 100 व्या वर्षी जीवन परिपूर्णतेला पोहोचते. म्हणूनच आपण या वयात वृद्धांना पाहतो तेव्हा आपण त्यांच्या पायांना स्पर्श करतो आणि म्हणतो, आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हालाही चांगल्या जीवनासाठी त्याच गुणांची गरज आहे. तुम्हाला असे वृद्ध लोक दिसले तर त्यांचे आशीर्वाद जरूर घ्या.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

The Politics Lab | बातमीमागचं राजकारण, पडद्यामागची कारणं | Pune News
शिवसेना (UBT) खासदार अरविंद सावंत यांची पत्रकार परिषद #live
भ्रमंती – Official Logo Reveal | Pune News Original Travel Series #travel #video
देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


