इंदूरजवळील अपघातातील बस अमळनेर आगाराची; चालक, वाहकासह अनेक प्रवासी जळगाव जिल्‍ह्यातील

जळगाव : मध्यप्रदेशातील खरगोन आणि धार जिल्ह्याच्या लगत नर्मदा नदीत बस कोसळून १२ प्रवाशांचा मृत्‍यू झाला आहे. सदरची बस ही राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या जळगाव विभागातील अमळनेर आगाराची असून बहुतांश प्रवाशी हे जळगाव जिल्‍ह्यातील असल्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

जळगाव विभागातील अमळनेर डेपोची अमळनेर ते इंदूर या मार्गावर बससेवा सुरू आहे. सकाळी साडेसातला इंदूर येथून अमळनेर डेपोची बस (क्र. एमएच ४० एन ९८४८) परतीच्‍या मार्गाला लागली होती. या दरम्‍यान खरगोन आणि धार या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर असणार्‍या खलघाट गावाजवळ नर्मदा नदीच्या पात्रात बस कोसळली. यात सुमारे ४० प्रवासी असून यातील काही प्रवासी बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

चालक, वाहकाशीही संपर्क नाही

इंदोर येथे नदीत पडलेली बस ही अमळनेर आगाराची असल्‍यासंदर्भात जळगावचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दुजोरा दिला आहे. सदर बसवर चंद्रकांत एकनाथ पाटील (चालक क्र. १८६०३) व वाहक प्रकाश श्रावण चौधरी (८७५५) हे होते. परंतु, त्‍यांच्‍याशी अद्याप संपर्क झालेला नाही. तर या भीषण अपघातानंतर परिसरातील जनतेसह पोलीस प्रशासनाने धाव घेऊन रेस्न्यू ऑपरेशन सुरू केले आहे. सदर अपघातासंदर्भात माहिती मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने ०२२/२३०२३९४० हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वित केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply