आजपासून १२ ते १४ वयोगटासाठी Corbevax लस; वृद्धांच्या तिसऱ्या लशीचा श्रीगणेशा

पुणे - कोरोना प्रतिबंधक लसीकरणात १२ ते १४ या आणखी एका वयोगटाचा समावेश करण्यात आला. या अंतर्गत कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) ही लस पुण्यासह राज्यात बुधवारपासून (ता. १६) देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात लशींचे ३९ लाख डोस मिळाले आहेत. दुसरीकडे, देशातील वयोवृद्धांना तिसरा डोस देण्याचा श्रीगणेशा होणार आहे. कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस हेच सर्वांत प्रभावी माध्यम असल्याचे तिसऱ्या लाटेच्या उद्रेकात अधोरेखित झाले. लस घेतलेल्या बहुतांश जणांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. काही जणांना झाला तरीही त्याची कोणतीही ठळक लक्षणे नव्हती किंवा तो सौम्य होता. लसीकरणामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले नाही. त्यामुळे आतापर्यंत १५ ते १८ वर्षे वयोगटपुढील नागरिकांना लसीकरण खुले केले होते. लसीकरणाचा वय आता १२ वर्षांपर्यंत कमी करण्यात आले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, ‘‘राज्य सरकारला केंद्राकडून कॉर्बेव्हॅक्स कोरोना प्रतिबंधक लशींचे ३९ लाख लशीचे डोस मिळाले आहेत. त्याचे वितरण आरोग्य खात्याच्या परिमंडळांना केले आहे. तेथून पुढे प्रत्येक जिल्ह्यात आणि महापालिकांना होईल. कॉर्बेव्हॅक्स लशीचे वितरणाची प्रक्रिया आता सुरू आहे.’’ पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा यासाठी राज्य सरकारकडून एक लाख दोन हजार सहाशे लशीचे डोस आले आहेत. त्यापैकी पुण्याच्या ग्रामीण भागासाठी ४८ हजार १०० डोसचे वितरण करण्यात आले. पुणे महापालिकेसाठी ३३ हजार आणि पिंपरी-चिंचवडसाठी २१ हजार ५०० लशीच्या डोसचा पुरवठा झाला आहे. - डॉ. संजय देशमुख, सहायक संचालक (वैद्यकीय), पुणे परिमंडळ, आरोग्य खाते महापालिकेला ‘कॉर्बेव्हॅक्स’ लशींचे ३२ हजार ४०० डोस मिळाले आहेत. येत्या बुधवारी (ता. १६) शहरातील २९ लसीकरण केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. या सर्व केंद्रांवर मिळून प्रत्येकी १५० याप्रमाणे ४ हजार ३५० डोसचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात सुमारे १ लाख ७५ हजार मुलांना या लशीचा डोस देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. - डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply