भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ यांना अनोखा अंदाज मुंबईकरांना पाहायला मिळाला. इतके बिझी शेड्युल असतानाही त्यांनी स्वत: च्या प्रकृतीसाठी खास वेळ काढला आणि मरिन ड्राईव्हवर ते सर्वसामान्य मुंबईकरांसारखे जॉगिंग करताना दिसले.त्यांना अनेकांना ओळखले नाही तर काही मुंबईकरांनी ओळखत त्यांना पाहून आश्चर्य व्यक्त केले. इमॅन्युएल माक्राँ यांचा सकाळचा जॉगिंग करताना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मुंबईकरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. माक्राँ त्यांची पत्नी ब्रिगिट्टी मॅरी – क्लाऊडे माक्राँ यांच्यासह सोमवारी रात्री भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांची मरीन ड्राईव्हवर जॉगिंग
रात्री ताज हॉटेलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर सकाळी फ्रान्सचे अध्यक्ष माक्राँ ब्ल्यु टी-शर्ट आणि काळ्या शॉर्ट्समध्ये मुंबईच्या प्रसिद्ध मरीन ड्राईव्हवर जॉगिंग करताना ते दिसले. त्यांच्या सोबत साध्या वेषात सुरक्षा अधिकारी देखील होते…तेही त्यांच्यासोबत धावत होते.
तरीही माक्राँ हे आरामात धावताना मुंबईच्या सकाळच्या वातावरणाचा आनंद घेताना दिसले. त्यांना असे धावताना पाहून काही मुंबईकरांनी त्यांना ओळखणाऱ्यांनी त्यांचे व्हिडीओ चित्रित केले. ते हात हालवून लोकांचे अभिवादन स्वीकारताना दिसले.
त्यांना अशा प्रकारे निश्चिंत होऊन जॉगिंग करताना पाहून उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या एक्स एकाऊंटवर लिहीले की यामुळे एक स्पष्ट होते की त्यांच्या सोबत सुरक्षेचा मोठा लवाजमा नव्हता.सुरक्षारक्षकही मोजके होते. ते शहरातील लोकांमध्ये मिक्स झालेले दिसले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेतागिरी करण्यासाठी स्टॅमिनाची गरज असते हे आपल्याकडील नेत्यांना कळायला हवे.
26/11च्या शहीदांना ताज हॉटेलात वाहिली श्रद्धांजली
माक्राँ यांनी मरीन ड्राईवर जॉगिंग केल्यानंतर त्यांच्या पत्नी सोबत ताज हॉटेलात 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यातील शहीदांच्या स्मृतीसाठी बनवलेल्या स्मारकाला श्रद्धांजली वाहिली.त्यांना भेटण्यासाठी बॉलिवूडचे कलाकारही येथे आले होते. यात अनिल कपूर, मनोज वाजपेयी, शबाना आझमी आणि ऋचा चढ्ढा आदी कलाकार होते. माक्राँ यांनी नंतर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या इमारतीला देखील भेट दिली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


