अकोला : शिवसेना ठाकरे गटाला धक्का; शिवसंग्रामच्या प्रदेश उपाध्यक्षाचा शिंदे गटात प्रवेश

अकोला : स्व. विनायक मेटे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा संघटक माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 

शिंदे गटाच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटामध्ये पक्ष प्रवेशासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढत आहे. अकोल्यात ही इतर राजकीय पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी पक्ष प्रवेश करीत आहे. त्याच माध्यमातून स्व. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षातील प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गोपाल नागापुरे यांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत पक्षात प्रवेश घेतला. बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना घेऊन पक्षात प्रवेश केला आहे. पक्ष संघटन करून पक्ष मजबूत करणार असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले.

शिंदे गटाकडून पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना नेमकी कोणती जबाबदारी द्यायची आहे. हे अद्याप निश्चित झाले नसले तरी त्यांना समिती निर्णय घेऊन योग्य ते पद देईल, असे माजी आमदार व शिंदे गटाचे जिल्हा संघटक गोपीकिशन बाजीराव यांनी आपल्या भाषणात सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप अश्विन नवले, शहराध्यक्ष योगेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply