खेड शिवापूर नाक्यावर टोलमाफी बंद

खेड शिवापूर - पुणे-सातारा रस्त्यावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर (Khed Shivapur Toll Naka) ‘एम एच १२’ आणि ‘एम एच १४’ या वाहनांची टोलमाफी (Toll Free) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) बंद केली आहे. पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे (Road Work) पूर्ण झाल्याने आम्ही ही टोलमाफी बंद केली आहे. १ मार्चपासून या वाहनांना टोल आकारण्यात येत आहे, असे ‘एनएचएआय’कडून (NHAI) सांगण्यात आले. पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची रखडलेली कामे वेळेत पूर्ण करावीत आणि खेड शिवापूर टोलनाका ‘पीएमारडीए’च्या हद्दीबाहेर हलविण्यात यावा, या मागणीसाठी खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समितीच्या वतीने तीन वर्षांपूर्वी आंदोलन केले होते. या वेळी या मागण्यांसंदर्भात नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, तोपर्यंत हवेली (पुणे शहर + पिंपरी चिंचवड), भोर, वेल्हे, मुळशी आणि पुरंदर या पाच तालुक्यातील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन ‘एनएचएआय’ने दिले होते. रस्त्याची कामे पूर्ण झाली असून, वाहतुकीस कुठेही अडथळा होत नाही. त्यामुळे एमएच १२ आणि एमएच १४ च्या वाहनांना टोल घेण्यात येत आहे. ‘रस्त्याची कामे पूर्ण झाली असून, टोल द्या’ अशी आम्ही विनंती करत आहोत. टोल नाका पुढे हटविण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. त्याचा टोलमाफीशी संबंध नाही. - अमित भाटिया, व्यवस्थापक, पुणे-सातारा टोल रोड


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply