राज्यात आजच्याच दिवशी आढळला होता कोरोनाचा पहिला रुग्ण; कशी होती पुण्याची स्थिती?

Two years of pandemic : महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले 2 रुग्ण (First Corona Patient Found in Pune) आढळल्याच्या घडनेला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहे. पुण्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 9 मार्च 2020 रोजी आढळले. पुण्यात धायरी (Dhayari) परिसरातील रहिवासी असलेले दाम्पत्य त्यांच्या मुलीसह दुबईवरुन 40 लोकांच्याग्रुपसोबत पुण्यात परतले होते. मुंबई(Mumbai) येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 मार्चला त्यांचे विमान उतरले होते. त्यांनतर त्यातील प्रवासी मुंबई, नागपूर, पुणे सह राज्यातील विविध भागातील घरी परतले होते. पहिले रुग्ण सापडल्यानंतर सह प्रवाशांना कोणतेही लक्षण नसले तरी खबरदारी म्हणून स्वॅब टेस्ट करण्यात आले. 8 दिवसांमध्ये टेस्ट रिपोर्ट येण्यापूर्वीच पहिल्या 2 कोरोना (Corona) संशयित रुग्णांना 9 मार्चला पुणे महापालिकेच्या नायडु हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यानंतर दाम्पत्यांची मुलगी देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. कोरोना विषाणूचा प्रसार वेगात होत असल्याने दाम्पत्यासह मुंबई एअरपोर्ट ते पुणे दरम्यान प्रवास करणारा कॅब ड्राईव्हर देखील पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. (Corona's first patient was found on the same day in Maharashtra how Pune Fights back) जागतिक कोरोना महामारीच्या काळात पहिला रुग्ण आढळल्यापासून ते कोरोना प्रतिबंधक लस निर्मीतीमध्ये मुख्य केंद्र होईपर्यंत सर्व घडामोंडीचे केंद्रबिंदू पुणे ठरले. आत्तापर्यंत, संपूर्ण जिल्ह्यात 14.5 लाखांहून अधिक व्यक्तींनी कोरोनाची लागण झाली असून यापैकी 6.6 लाखांहून अधिक पुणे शहरातील आहेत आणि नागरी आणि राज्य आरोग्य प्राधिकरणांच्या मते, पुणे हे देशातील सर्वात जास्त प्रभावित शहरांपैकी एक होते. पुणे जिल्ह्यात तब्बल 19,682 रु्ग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद असून त्यापैकी 9,348 शहरातील आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply