पुणे - मुंबईच्या (Mumbai) धर्तीवर पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad City) झोपडीधारकांना (Slum Owners) २६९ चौरस फूट (२५ चौरस मीटर) ऐवजी ३०० चौरस फुटांची (२७.८८ चौरस मीटर कार्पेट) सदनिका मोफत (Free Flat) मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप सुधारित नियमावलीत ही तरतूद करण्यात आली होती. झोपडपट्टीधारकांना सदनिकांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याबाबतची प्रारूप नियमावलीतील या तरतुदीबाबत स्वतंत्र आदेश काढीत त्यास राज्य सरकारकडून त्यास मान्यता देण्यात आली.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी २००५ मध्ये राज्य सरकारकडून एसआरएची स्थापन करण्यात आली. या प्राधिकरणामार्फत २००८ मध्ये झोपडपट्टीचे पुनर्वसन प्रकल्पासाठी नियमावली तयार करण्यात आली. त्यामध्ये झोपडीधारकांना २५ चौरस मीटर क्षेत्रफळाची सदनिका मोफत देण्याची, तसेच त्यासाठी जास्तीत जास्त तीन एफएसआय वापरून बांधकामास परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र, २०१५ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने
त्यामध्ये सुधारणा करीत अशा प्रकल्पांसाठी देण्यात येणाऱ्या एफएसआयमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन प्रकल्पांचे काम ठप्प पडले होते.
राज्यात सत्ताबदल होऊन भाजप-सेना युतीचे सरकार आल्यानंतर प्राधिकरणाच्या नियमावलीत बदल होईल, अपेक्षित होते. परंतु तत्कालीन सरकारने अशा प्रकल्पांसाठी नवीन फ्युर्मला वापरून बांधकामास परवानगी देण्याचे आदेश काढले.
त्यामुळे अनेक ठिकाणच्या योजना अडचणीत आल्या. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाकडून नव्याने सुधारित नियमावली तयार करून राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविली होती. त्यामध्ये झोपडीधारकांना २६९ ऐवजी ३०० चौरस फुटांचे घर द्यावे, अशी शिफारस करण्यात आली होती. या नियमावलीवरील हरकती-सूचनांची प्रक्रिया पूर्ण करून प्राधिकरणाने अंतिम मान्यतेसाठी ती राज्य सरकारकडे यापूर्वीच पाठविली आहे. मात्र, राज्य सरकारकडून त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही.
दरम्यान, आज या नियमावलीतील झोपडीधारकांना देण्यात येणाऱ्या सदनिकांच्या क्षेत्रफळात वाढ करण्यासंदर्भातील तरतूद मान्य करीत त्याबाबतचे स्वतंत्र आदेश आज राज्य सरकारच्या नगर विकास खात्याचे अवर सचिव किशोर गोखले यांनी काढले. त्यामुळे यापुढे नव्याने होणाऱ्या सर्व योजनांमध्ये सदनिकाधारकांना ३०० चौरस फुटांचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हे पण वाचा-
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
गुन्हा
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम



















Subscribe to my channel




