जागतिक महिला दिन; महिलांनी स्पष्ट केला स्वातंत्र्याचा अर्थ

स्वातंत्र्यानंतर देशाने प्रत्येक क्षेत्रात झेप घेतली. मोठा बदल घडत गेला तो म्हणजे स्त्रियांच्या आयुष्यात. स्त्रियांच्या प्रगतीसाठी, सुरक्षेसाठी नवीन कायदे केले जात आहेत. महिलांना सामाजिक, वैयक्तिक स्वातंत्र्य मिळाले तरच देश प्रगती करू शकेल. त्यांच्या वैयक्तिक जीवनात विकास होऊ शकेल, असे मत महिलांनी व्यक्त केले आहे. प्रत्येक महिलेसाठी स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा असतो. आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. महिलादिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मते स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे हे स्पष्ट केले.(World Women Day) ‘‘ मी याआधी घरीच शिलाई काम करायचे. परंतु, त्यात मला परवडत नव्हतं. माझे तीन मुलं शिक्षण घेत आहेत. पतीच्या वेतनामध्ये घर खर्च, मुलांचे शिक्षण इतर खर्च भागविणे कठीण झाले होते. मी बाहेर पडून काहीतरी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला माझ्या पतीने मला प्रोत्साहन दिले. मला सोसायटीमध्ये सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळाली. आता घरात मी पण काम करून कमावीत असल्यामुळे आर्थिक आधार मिळाला आहे. महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहणं, काहीतरी ती तिच्या इच्छेनुसार करणं म्हणजे तिचा खरं स्वातंत्र्य आहे.’’ -मुबिना शेख - सफाई कर्मचारी ‘‘महिलांना त्यांच्या आयुष्यातील निर्णय घेऊ दिले पाहिजेत, नवीन गोष्टी करण्याचे प्रोत्साहन तिला दिले पाहिजे, तिला स्वतः काही करण्याची संधी मिळाली तरच महिला वैयक्तिक आणि सामाजिक क्षेत्रात प्रगती करू शकेल. गेल्या २० वर्षांपासून मी फुटवेअर्सचा व्यवसाय करीत आहे. माझ्या घरच्यांनी मला प्रेरित केलं, आधार दिला, संधी दिली, त्यामुळे मी या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अशी सक्षम होण्यासाठी संधी, प्रोत्साहन, आधार प्रत्येक महिलेला मिळणे म्हणजे स्वातंत्र्य आहे.’’ -रूपाली काळे - व्यावसायिक


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply