Pune Crime: पुण्यात चाललंय काय? बिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार, तरुण गंभीर जखमी

Pune : पुण्यामध्ये भरदिवसा गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तरुणावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारामध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. बिबवेवाडीमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात एका तरूणावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला. पुण्यातल्या बिबवेवाडी येथील संविधान चौकात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घडली. या घटनेत पवन गवळी नावाचा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या पाठीला गोळी लागली आहे. पोलिसांकडून सध्या या घटनेचा तपास सुरु आहे.

Patna News : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याच्या १८ वर्षीय मुलाची आत्महत्या, नेमकं कारण काय?

घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. भर रस्त्यावर ही घटना घडल्याने बिबवेवाडीमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांना दोन्ही आरोपींची माहिती मिळाली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply