मुंबई: गृहस्वामिनींसाठी सरकारचे प्रोत्साहन

मुंबई: बाईच्या नावावर घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा लाभ राज्यात पाच हजार १२७ महिलांनी घेतला आहे. महाराष्ट्र राजमाता गृहस्वामिनी योजनेसाठी राज्य सरकारला १६७ कोटी महसुलावर पाणी सोडावे लागले असले तरी महिलेच्या नावावर आवर्जून घर घेण्यास त्यामुळे प्रोत्साहन मिळत असल्याने नवीन आर्थिक वर्षातही ही योजना राज्य सरकारने सुरु ठेवली आहे.

बाईच्या नावावर घर खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी असला तरी आश्वासक असल्याने २०२२ -२०२३ मध्ये देखील ही योजना सुरु ठेवली जाणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली. कोरोना संक्रमणाचा प्रभाव कमी होत असल्याने नवीन आर्थिक वर्षात घर खरेदी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा सात हजार ५२५ घरांची नोंदणी महिलेच्या नावावर होण्याची शक्यता महसूल विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे विभागाला २३५ कोटी महसुलाचा तोटा होणार आहे.

बाईच्या नावावर घर खरेदी केले गेले तर तिला मिळणारी सुरक्षितता देखील आपोआपच वाढते, या कल्पनेतून अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२१ -२०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्र राजमाता गृहस्वामिनी योजना जाहीर केली होती. ग्रामीण भागामध्ये बाईचे नाव घराच्या पाटीवर लिहिण्याची मोहिमदेखील सुरु आहे. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून बाईच्या नावावर घर खरेदी करण्याच्या या योजनेकडे पाहिले जात आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply