Mumbai Local : मुंबईत वरुणराजा अवकाळी बरसला, रस्त्यावर पाणी, लोकलचा खोळंबा; चाकरमान्यांचा वेट अँड वॉच

 

Mumbai : मुंबईच्या पश्चिम उपनगरात ७ वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पश्चिम उपननगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, विलेपार्ले, सांताक्रुझ आणि वांद्रेमध्ये पाऊस पडल्याने चाकरमान्यांची धांदल उडाली आहे. या पावसामुळे पश्चिम रेल्वेवर १० ते १५ मिनिटे उशिरा ट्रेन धावत होत्या, त्यामुळे प्रवासी बेजार झाले. या पावसामुळे पश्चिम रेल्वेवर १० ते १५ मिनिटे उशिरा ट्रेन धावत होत्या, त्यामुळे प्रवासी बेजार झाले.

ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे अंधेरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या दररोजच्या तुलनेमध्ये आज गर्दी वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळालं. वसई विरारमध्ये सायंकाळी ही अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. काल रात्री ९ वाजल्यापासून वादळी वाऱ्या सह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती. सकाळपासून ही पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसत होत्या. अवकाळी पावसामुळे वसई विरारमध्ये अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. तर वसईच्या बागायतीचंही नुकसान झालं आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply