पुणे : स्थगन प्रस्तावांवर अधिसभेत खडाजंगी

पुणे : राज्यपालांचे वक्तव्य, कुलसचिवांवरील आरोप आणि अधिष्ठात्यांवरील आर्थिक गुन्ह्यासंबंधीच्या स्थगन प्रस्तावाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. बुधवारी विद्यापीठाच्या दोन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली. कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन असल्याने कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अभिभाषणातून मागील पाच वर्षांचा लेखाजोखा मांडला.

कुलगुरूंच्या अभिभाषणानंतर स्थगन प्रस्तावावरील चर्चेत डॉ. कान्हू गिरमकर, डॉ. नंदू पवार, दादाभाऊ शिनलकर, डॉ. पंकज मणियार, बाळासाहेब सागडे, संतोष ढोरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. यावरील काही प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा झाल्याने, ते मागे घेण्यात आले. दोन प्रस्ताव हे अधिसभेच्या कार्यकक्षेत येत नसल्याने, ते बाजूला ठेवण्याचा डॉ. करमळकर यांनी प्रयत्न केला. मात्र, त्याबाबत सदस्यांनी आक्रमकपणे बाजू मांडली. निषेधाच्या टोप्या आणि गळ्यात पाट्या अडकवत सदस्यांनी आपला निषेध नोंदविला. राज्यपालांचे वादग्रस्त विधान आणि अधिष्ठात्यांवरील आर्थिक गुन्ह्यांमुळे सदस्यत्व रद्द करण्यासंबंधीचे हे स्थगन प्रस्ताव होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply