पुणे : कात्रजच्या प्राणीसंग्रहालयाला गेल्या आठ दिवसात ५५ हजार पर्यटकांची भेट

कात्रज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय २० मार्च २०२२ रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर पर्यटकांमध्ये प्राणी संग्रहालयात भेट देण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र आहे. प्राणिसंग्रहालय सुरु झाल्यापासून २० मार्च ते २७ मार्च या आठ दिवसांच्या कालावधीत तब्बल एकूण ५५ हजार ४८८ पर्यटकांनी भेट दिली आहे. यामधून एकूण १९ लाख ३२ हजार १६० रुपयांचे उत्पन्न प्राणीसंग्रहालयाला प्राप्त झाल्याची माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनाने दिली आहे.

पहिल्या दिवशी म्हणजेच पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यानंतर गर्दीचा ओघ काही प्रमाणांत कमी झालेला दिसला. मात्र, शनिवार आणि रविवारी पुन्हा मोठ्या प्रमाणांत गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरोनापूर्वी साधारणतः दिवसाला अंदाजे ४ ते ५ हजार पर्यटक प्राणीसंग्रहालयाला भेट देत होते. तर हाच आकडा सुटीच्या दिवशी १० हजारांपर्यंत जात असे. मात्र आता या आकड्यांत वाढ झालेली दिसून येत आहे. रविवारी सुटीच्या दिवसी म्हणजे २७ मार्च रोजी एका दिवसांत १६ हजार ५१४ पर्यटकांनी प्राणिसंग्रहालयाला भेट दिली आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply