मेन्स टीम इंडिया मायदेशात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत खेळत आहे. टीम इंडियाने यूएसए, नामिबिया आणि त्यानंतर पाकिस्तानला पराभूत करत सलग तिसरा विजय मिळवला. भारताने साखळी फेरीतील तिसऱ्या विजयासह सुपर 8 फेरीत प्रवेश केला. एका बाजूला टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेत खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाची महिला ब्रिगेड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी 20I मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर दुसरा सामना हा 19 फेब्रुवारीला होणार आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20I नंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. त्याआधी मोठी अपडेट समोर आली आहे. टीम इंडियात वर्ल्ड कप विनर ओपनर बॅट्समन प्रतिका रावल हीची एन्ट्री झाली आहे. प्रतिकाचा ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे.
प्रतिकाच्या समावेशामुळे टीम इंडियाची ताकद आणखी वाढली आहे. उभयसंघात 24 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान एकदिवसीय मालिका होणार आहे. प्रतिकाने भारताला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. मात्र प्रतिकाला दुखापतीमुळे उपांत्य फेरीआधी वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होतं.
प्रतिकाला वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान ऑक्टोबरमध्ये घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांना मुकावं लागलं होतं. त्यानंतर प्रतिकाच्या जागी लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा हीचा समावेश करण्यात आला होता. शफालीने या संधीचा फायदा घेत भारतासाठी प्रमुख भूमिका बजावली.
प्रतिकाची दुखापतीवर मात
प्रतिका या घोट्याच्या दुखापतीनंतर बंगळुरुतील सीओईमध्ये रिहॅब करत होती. प्रतिकाने अखेर या दुखापतीवर यशस्वीरित्या मात केली. त्यानंतर सीओईकडून प्रतिका फिट असल्याचं जाहीर करण्यात आलं. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
प्रतिका रावलंच भारतीय संघात कमबॅक
🚨 News 🚨
Pratika Rawal added to #TeamIndia’s squad for ODI series against Australia women.
Details 🔽 | #AUSvIND https://t.co/az1T6JBB2h
— BCCI Women (@BCCIWomen) February 17, 2026
भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 24 फेब्रुवारी, ब्रिस्बेन
दुसरा सामना, 27 फेब्रुवारी, होबार्ट
तिसरा सामना, 1 मार्च, होबार्ट
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी सुधारित भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्री चरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), उमा चेत्री (विकेटकीपर), काश्वी गौतम, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल आणि प्रतिका रावल.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




