
मुंबई : मागील चार दिवसांपासून सुरू असलेला राज्यातील सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांचा संप मंगळवारी मागे घेतला जाण्याची शक्यता होती. वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि परिचारिकांचे शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याने रात्रीपर्यंत संप मागे घेतला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र मागण्यांबाबत लेखी आश्वासन तसेच बैठकीचे इतिवृत्त मिळाल्याशिवाय संप मागे न घेण्याची भूमिका परिचारिका संघटनांनी घेतली. परंतु रात्री उशिरापर्यंत लेखी आश्वासन न मिळाल्याने संप सुरू ठेवण्याचा निर्णय परिचारिका संघटनांनी घेतला. त्यामुळे बुधवारीही संप सुरूच राहणार आहे.
परिचारिकांची विनंती आधारित बदली करण्यासह पदभरती, पदोन्नती इत्यादी बऱ्याच काळापासून प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांनी २८ मेपासून बेमुदत संप पुकारला. राज्यभरातील हजारो परिचारिका बेमुदत संपावर गेल्याने मुंबईतील जे जे रुग्णालय, जी टी रुग्णालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयासह राज्यातील सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. अनेक शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या आहेत.
सरकारने मंगळवारी अखेर या आंदोलनाची दखल घेतली. दुपारी मंत्रालयात अमित देशमुख आणि संघटनांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मागण्यांवर चर्चा झाली आणि या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन यावेळी देशमुख यांनी दिले. मात्र त्याचवेळी या मागण्या पूर्ण करण्यासाठी किमान एक महिना लागेल, असेही स्पष्ट केले. एकूणच चर्चा सकारात्मक झाल्याने रात्रीपर्यंत संप मागे घेतला जाईल असे वाटत होते. परंतु बैठकीचे इतिवृत्त हाती न मिळाल्याने संप सुरूच राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा डॉ मनीषा शिंदे यांनी दिली. बैठकीचे इतिवृत्त मिळाल्यानंतर सहकाऱ्यांशी चर्चा करून संपाबाबत निर्णय घेऊ असेही त्यांनी सांगितले.
शहर
- Ratnagiri : शिमगोत्सवासाठी मुंबईहून निघालेल्या खासगी बसला भीषण अपघात; 28 प्रवाशांसह बस उलटली
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


