सोशल मीडियावर ‘प्रसिका’ या नावाने प्रसाद आणि दीपिका वेदपाठक ही नवरा-बायकोची जोडी खूप लोकप्रिय आहे. परंतु या दोघांना नुकताच मोठा झटका मिळाला आहे. प्रसाद आणि दीपिकाचे सोशल मीडिया अकाऊंट अचानक सस्पेंड झाले आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या सर्व प्रमुख अकाऊंट्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रसिद्ध जोडप्याचे सोशल चॅनल्स अचानक बंद झाल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. ‘मेटा’ने नेमकी अशी कारवाई का केली आणि त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स का सस्पेंड करण्यात आले, याविषयी अनेकजण प्रश्न विचारत आहेत. ‘प्रसिका’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या या जोडीचे खास जेवण बनवतानाचे व्हिडीओ तुफान व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडिया अकाऊंट्सवर झालेल्या कारवाईबाबत प्रसादने माहिती दिली आहे. तो म्हणाला, “गेल्या दहा वर्षांपासून आम्ही प्रामाणिकपणे कंटेंट बनवतोय. आम्ही कधीही कम्युनिटी गाइडलाइन्सचं (नियमांचं) उल्लंघन केलेलं नाही. सर्व नियम पाळूनसुद्धा आमचे सर्व अकाऊंट्स अचानक सस्पेंड करण्यात आले आहेत. यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.” त्याचप्रमाणे त्याने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचीही विनंती संबंधित प्लॅटफॉर्म्सना केली आहे.
याविषयी प्रसादने पुढे सांगितलं, “आमच्या सर्व अकाऊंट्स व्हेरिफाइट होत्या. सध्या आमचे ब्रँड्स आणि क्लायंट्स प्रतीक्षा करत आहेत. आमचे ब्रँड्ससोबतचे बरेच प्रोजेक्ट्स रखडले आहेत. अकाऊंटचा एक्सेस नसल्याने ते काम पूर्ण करता येत नाहीये.” “नमस्कार मंडळी, सर्वांनी जेवायला या..” असं म्हणत प्रसाद त्याच्या व्हिडीओची सुरुवात करायचा आणि त्यानंतर दीपिका तिच्या खास अंदाजात एकापेक्षा एक दमदार असे पदार्थ बनवून दाखवायची. ‘आपलं मीठ’ हा तिचा खास डायलॉग प्रसिद्ध होता.
संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. परंतु प्रसाद आणि दीपिकाने त्यांचे सर्व अकाऊंट्स पुन्हा सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. नेटकऱ्यांनीही त्यांच्या बाजूने अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंट आणि युट्यूब चॅनल्सद्वारे असंख्य इन्फ्लुएन्सर्स दर महिन्याला लाखोंची कमाई करतात. सोशल मीडिया हीच त्यांची मोठी ओळख असते. अशातच अचानक अशा पद्धतीने कारवाई झाल्यामुळे त्यांना मोठा फटका बसतो. त्यातही अकाऊंट रिकव्हर झाल्यानंतर काही फॉलोअर्स गमवावे लागले तरी त्यांना नुकसान सहन करावं लागतं.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




