औरंगाबाद : धक्कादायक ! गरोदर महिलेची आत्महत्या, नातेवाईकांमध्ये हाणामारी

औरंगाबाद : वाळूज परिसरात एका गरोदर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज शनिवारी (ता.२८) पहाटे उघडकीस आली आहे. जयश्री रितेश पाटील (वय २४, रा. बजाजनगर ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्या दोन महिन्यांच्या गरोदर होत्या. जयश्री यांनी राहत्या घरात फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शनिवारी पहाटे उघडकीस आली आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जयश्री यांना औरंगाबाद  येथील घाटी रुग्णालयात हलविले. डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. जयश्री यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालय गाठले. या वेळी नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली.

वाद वाढू नये म्हणून घाटी परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *