छत्रपती संभाजीनगर: शहरातील देवगाव रंगारी येथील एका नामांकित शाळेत एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर घटना समोर आली आहे. शाळेतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने किरकोळ कारणावरून आपल्याच वर्गातील चार वर्गमित्रांवर पॉकेट चाकूने प्राणघातक वार केले आहेत. या भीषण हल्ल्यात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी तातडीने घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेने शैक्षणिक वर्तुळात आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून शाळेच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकी काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास शाळेत जेवणाची सुट्टी झाली होती. जेवणानंतर सर्व विद्यार्थी हात धुण्यासाठी ओळीने उभे होते. यावेळी एका विद्यार्थ्याचा धक्का वर्गातील काही मुलांना लागला. "मला धक्का का दिला?" यावरून मुलांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या किरकोळ वादाचे रूपांतर काही क्षणातच भयंकर हिंसाचारात झाले. संतापलेल्या त्या विद्यार्थ्याने उपस्थित असलेल्या मुलांना, "थांबा, तुम्हाला बघतोच!" अशी धमकी दिली आणि तो वर्गाच्या दिशेने निघून गेला.
काही वेळातच तो विद्यार्थी आपल्या खिशातून पॉकेट चाकू काढून पुन्हा तिथे परतला. त्याने काही समजण्याआधीच समोर असलेल्या चार विद्यार्थ्यांवर चाकूने सपासप वार केले. हल्ल्यात दोन विद्यार्थ्यांच्या उजव्या दंडावर, एकाच्या उजव्या पायावर आणि एकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. वर्गात आणि परिसरात रक्ताचे डाग पाहून इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्रशासनाची कारवाई:
घटनेची माहिती मिळताच शाळा प्रशासनाने धावपळ करून जखमी विद्यार्थ्यांना तातडीने गावातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असलेल्या विद्यार्थ्याला छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हल्ला करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
शहर
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- मुंबई: पुणे एक्सप्रेसवेच्या 'मिसिंग लिंक'वर भीषण काळ फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; २ तास वाहतूक ठप्प.
- पुणे: सावरकर बदनामी प्रकरण उलटतपासणीसाठी निश्चित 'टाईमटेबल' द्या; फिर्यादी सात्यकी सावरकरांची न्यायालयात मागणी.
- पुणे: हिंजवडीत प्रेमाचा थरार एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या जोडीदाराची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर जखमी; आरोपी जेरबंद.
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: लाचलुचपत विभागाचा बनावट अधिकारी बनून शासकीय नोकरीचे आमिष; तरुणीसह वडिलांना लाखांचा गंडा, कणकवलीत गुन्हा दाखल.
- मुंबई: चालत्या लोकल ट्रेनमध्ये थरार, संतापलेल्या तरुणाकडून महिलेला बेल्टने अमानुष मारहाण; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
- मुंबई: पुणे एक्सप्रेसवेच्या 'मिसिंग लिंक'वर भीषण काळ फॉर्च्युनरचा चक्काचूर, एकाचा मृत्यू; २ तास वाहतूक ठप्प.
- पुणे: सावरकर बदनामी प्रकरण उलटतपासणीसाठी निश्चित 'टाईमटेबल' द्या; फिर्यादी सात्यकी सावरकरांची न्यायालयात मागणी.
गुन्हा
- पुणे: हिंजवडीत प्रेमाचा थरार एक्स-गर्लफ्रेंडच्या नव्या जोडीदाराची निर्घृण हत्या, तरुणी गंभीर जखमी; आरोपी जेरबंद.
- नवी मुंबई: पनवेल हादरलं; वाल्मिकी नगरमधील सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून अत्याचार
- नागपुर: फ्रेंडशिप डे दिवशी थरार; लग्न आणि गिफ्टच्या वादातून तरुणीला नदीत ढकलून केली हत्या, खळबळजनक घटना उघड
- महाडमध्ये महिला डॉक्टरचा अमानुष छळ; १८ वर्षांत तब्बल १० वेळा सक्तीने गर्भपात केल्याप्रकरणी पतीवर गंभीर आरोप
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- हैदराबाद: ऑनलाईन बेटिंगचा बळी; युट्यूबवर पाहून हेलियम गॅसच्या सहाय्याने चार्टर्ड अकाऊंटंटने संपवले जीवन
- उत्तर प्रदेश: 'बायकोने मृतदेहाला स्पर्शही करायचा नाही, माझा आत्मा…', भाचीला सुसाइड नोट पाठवत जिम संचालक व कॉलेज लिपिकाने स्वतःला संपवले
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
























Subscribe to my channel




