Pakistan BLA Clash : पाकिस्तानात नेमहीच काहीतरी घडत असतं. या देशात कधी बॉम्बस्फोट होतो. तर कधी अजब फतवा निघतो. गेल्या काही दिवसांपासून तिथे पाकिस्तानी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मी अर्थात बीएलए यांच्यात मोठा संघर्ष सुरू आहे. बीएलएने पाकिस्तानात काही ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी लष्करानेही बीएलएच्या तळांना लक्ष्य केले. दरम्यान, आता याच संघर्षाबाबत मोठी आणि हादरवणारी माहिती समोर येत आहे. येथे बीएलएने आम्ही एकूण 17 पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. बीएलएच्या या कारवाईमुळे पाकिस्तानी लष्कराची झोप उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार बीएलएने एकूण 17 पाकिस्तानी सैनिकांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना बंदी बनवलं आहे. तसा दवाच बीएलएने केले आहे. यापैकी एकूण 10 सैनिकांना बीएलने सोडले असून अजूनही सात सैनिक त्यांच्याच ताब्यात आहेत. सोबतच या बंदी बनवलेल्या सैनिकांची सुटका हवी असेल तर पाकिस्तानी सरकारकडे बीएलएने मोठी मागणी केली आहे. बलुच भागातील बंदी केलेल्या लोकांची जोपर्यंत पाकिस्तानी सरकार, लष्कर जोपर्यंत सुटका करत नाही तोपर्यंत आम्हीदेखील 17 पाकिस्तानी सैनिकांची सुटका करणार नाही, अशी भूमिका बीएलएने घेतली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
बीएलएच्या मीडिया विभागाचे प्रवक्ते जीयंड बलोच यांनी याबाबत बीएलएची भूमिका स्पष्ट केली आहे. बीएलएची ही कृती ऑपरेशन हिरोफचा दुसरा भाग आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
उरलेल्या 7 सैनिकांवर नेमके आरोप काय?
जीयंड बलोच यांनी सांगितल्यानुसार 17 पैकी 10 पाकिस्तांनी सैनिकांना सोडून देण्यात आलं आहे. सोडून दिलेले 10 सैनिक हे बलुच प्रांतातील स्थानिक पोलीस संघटनांशी संबंधित होते. उर्वरीत 7 सैनिक हे पाकिस्तानी लष्कराशी संबंधित आहेत. बंदी म्हणून ठेवण्यात आलेल्या या सात सैनिकांविषयी बलुच नॅशनल कोर्टात सुनावणी झाली आहे. बीएलएच्या ताब्यात असलेल्या सैनिकांकडून बलुच येथील लोकांना त्रास दिला जातो, असा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर बंदी बनवलेल्या सैनिकांवर नरसंहाराचाही आरोप आहे.
पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेणार?
दरम्यान, आता बीएलएने पाकिस्तानी लष्करातील सैनिकांनाच बंदी बनवल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानी सरकार किंवा पाकिस्तानी लष्कराने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
- मंगळवेढ्यात दुष्काळाचे सावट! ३५ हजार हेक्टरवरील खरीप पेरणी खोळंबली; पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची चिंता वाढली
महाराष्ट्र
- बदलापूर: अनैतिक संबंधावरून पत्नीची निर्घृण हत्या; नवऱ्याचा 'हार्ट अटॅक'चा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड!
- बदलापूर हादरले! अनैतिक संबंधातून पत्नीची हत्या; नवऱ्याने 'हार्ट अटॅक'चा रचला बनाव, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड सत्य!
- वारंवार UPI पेमेंट केल्याने सिबिल स्कोअर कमी होतो का? जाणून घ्या यामागचं खरं सत्य!
- पुण्यात रंगणार 'इनोव्हेशन महाकुंभ २.०'; एसएनडीटीच्या १११ विद्यार्थिनी मांडणार स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण कल्पना
गुन्हा
- प्लाझ्मा विक्रीचा काळा बाजार? ठराविक फार्मा कंपन्यांना चढ्या दराने प्लाझ्मा विक्रीची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाकडे चौकशीची मागणी.
- पुणे: लोहगड हत्या प्रकरण: चेतन-केतन प्रकरणात नीरज कुमारची एन्ट्री; सिया गोयलशी काय कनेक्शन?
- 'बिडी आणि तंबाखूच्या पुडी'ने उघड केला आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १५० शेतकऱ्यांची केबल चोरणारे ५ जण गजाआड.
- धक्कादायक: लाच घेतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा राग; पोलीस कर्मचाऱ्याकडून कारचालकाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल.
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाचा नियम: पीएनजी कनेक्शन घेतल्यास ३० दिवसांच्या आत एलपीजी कनेक्शन सरेंडर करणे अनिवार्य!
- विराट कोहलीच्या 'One8' शूजची जबरदस्त क्रेझ! २४ तासांत दीड लाख जोड्यांची विक्री; जाणून घ्या किंमत.
- औषधांची विश्वासार्हता तपासणे होणार सोपे! आता सर्व लसी आणि कर्करोगाच्या औषधांवर 'QR कोड' अनिवार्य; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- अध्यात्मिक पर्यटनाची मोठी झेप! अयोध्या, काशी ते मथुरा-वृंदावन; 'या' धार्मिक शहरांमुळे उत्तर प्रदेश देशात अव्वल

























Subscribe to my channel



