औरंगाबाद - शहरात नशेखोरीचे प्रमाण वाढतच असून याच प्रकारातून ‘बटन’ गोळ्या खाऊन बेधुंद झालेल्या रेकॉर्डवरील एका आरोपीने त्याच्या साथीदाराचा चाकूने भोसकून निर्घृण खून केला. ही घटना रविवारी (ता.८) मध्यरात्री जिन्सीतील बायजीपुऱ्यातील सिकंदर हॉलजवळ भर रस्त्यावर मध्यरात्री १२ वाजेदरम्यान घडली. विशेष म्हणजे, आरोपी खून करुन रक्ताने माखलेल्या कपड्यांसह जिन्सी ठाण्यात गेला होता. मृतही रेकॉर्डवरील आरोपी आहे. हैदर ऊर्फ शारेख जफर खान (वय २२, रा. गल्ली नं. सी-११, संजयनगर) असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या गुन्हेगारीसंदर्भात वार्षिक अहवालात नशेखोरांचे प्रमाण वाढल्याची चिंता व्यक्त केली होती.
शाहरुख अन्वर शेख (वय-साडेसतरा वर्षे, रा. गल्ली नं. ३०, बायजीपूरा) असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख हा त्याच्या आजीकडे (आईची आई) राहायचा. त्याच्या बहिणीचे लग्न झालेले असून, वडिलांचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्याच्या आईने दुसरा विवाह केलेला आहे. मृत शाहरुख आणि आरोपी हैदर हे दोघे एकाच भागातील रहिवासी असल्याने आधीपासून ओळखीचे होते. रविवारी रात्री शाहरुख आणि हैदर सिकंदर हॉलसमोर एकत्र आले. हैदरकडे कमरेला चाकू लावलेला होता. बोलता-बोलता त्यांच्यात भांडण सुरू झाले. शाहरुख हा शरीराने लहान, तर हैदरची शरीरयष्टी बलदंड आहे. हैदरने शाहरुखला बेदम मारहाण करीत त्याच्यावर चाकूहल्ला चढविला. त्याच्या छातीत, बरगडीत, पाठीत आणि मांड्यांवर सहा ते सात वार केले. प्रचंड रक्तस्राव झाल्याने शाहरुख जागेवरच कोसळला. यादरम्यान, हैदरलाही एक ठिकाणी चाकू लागला. तोही जखमी झाला होता.
शाहरुखला गंभीर जखमी अवस्थेत सोडून हैदर रक्ताने माखलेल्या कपड्यांसह जिन्सी ठाण्यात गेला. हैदर खान हा जखमी अवस्थेत ठाण्यात आल्यामुळे पोलिसांनी आधी त्याला मेडिकल मेमो देऊन उपचारासाठी घाटीत पाठविले. त्यानंतर काही वेळातच सिकंदर हॉलसमोर शाहरूख शेख हा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली. जिन्सी ठाण्यातील उपनिरीक्षक अनंता तांगडे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शाहरूखला रिक्षाने घाटीत नेले. तेथे उपचार सुरू असताना शाहरूखची प्राणज्योत मालवली.
मृत शाहरूख शेखविरुद्ध जिन्सी ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार एक, चोरीचे तीन, घरफोडीचा एक, मारहाण व शिवीगाळ केल्याचा एक असे सहा गुन्हे दाखल आहेत. तर, आरोपी हैदरविरुद्ध २०१९ मध्ये मुंबई जुगार कायद्यानुसार एक गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली. केंद्रे यांनी शाहरूखला गुन्हेगारीपासून दूर ठेवा, असे त्याच्या आजीला अनेकदा सांगितले, पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर, नशेखोरी आणि गुन्हेगारीतचा त्याचा काटा काढण्यात आला. या प्रकरणी शाहरूखचा मामा जावेद खालेद पठाण (३२, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) यांच्या फिर्यादीवरून हैदर खानविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हैदरवर घाटीत उपचार सुरू आहेत.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




