नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता एका मिनिटात बुक होणार १.२५ लाख तिकीट; रेल्वेची क्षमता ५ पटींनी वाढली!

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. अनेकदा तत्काळ तिकीट बुक करताना सर्व्हर डाऊन होणे किंवा ॲप हँग होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो, मात्र आता रेल्वेने आपल्या 'पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम' (PRS) मध्ये मोठे अपग्रेड करण्याची तयारी केली आहे. या बदलानंतर तिकीट बुकिंगची क्षमता ५ पटींनी वाढणार आहे.

काय बदल होणार?
रेल्वे मंत्रालयाची तांत्रिक शाखा 'क्रिस' (CRIS) ही प्रणाली अद्ययावत करत आहे. सद्यस्थितीत रेल्वेची सिस्टिम एका मिनिटात केवळ २५ हजार तिकीट बुक करण्यास सक्षम आहे. नवीन अपग्रेडनंतर ही क्षमता थेट १.२५ लाख तिकीट प्रति मिनिट इतकी होणार आहे. याचा मोठा फायदा विशेषतः सणासुदीच्या काळात आणि तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळी प्रवाशांना होणार आहे.

 

दलालांना चाप:
या नव्या सिस्टिममुळे केवळ बुकिंगची स्पीड वाढणार नाही, तर सायबर सुरक्षा देखील अधिक मजबूत होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे तिकीट दलालांकडून वापरल्या जाणाऱ्या बेकायदेशीर सॉफ्टवेअरवर (Illegal Software) आळा बसणार आहे, ज्यामुळे सामान्य प्रवाशांना हक्काची तिकिटे मिळणे सोपे होईल.

'रेलवन' आणि एआयवर भर:
रेल्वे आता 'रेलवन' (RailOne) या सुपर ॲपवर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर (AI) लक्ष केंद्रित करत आहे. याद्वारे प्रवाशांना त्यांच्या पसंतीनुसार उत्तम सेवा पुरवण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. येत्या काही महिन्यांत ही अद्ययावत सिस्टिम पूर्णपणे कार्यान्वित होईल, ज्यामुळे प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळेल.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *