गुजरातमध्ये लाऊडस्पीकरवर भजन करणाऱ्याची हत्या

गुजरात  : लाऊडस्पीकरवर भजन म्हटले म्हणून गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात एका ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच समुदायातील व्यक्तींनी हत्या केली. गुजरातमध्ये गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा मंदिरावर लाऊडस्पीकर लावण्याच्या कारणावरून हत्या झाली आहे.

मेहसाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव जशवंतजी ठाकोर असे आहे. ते एक मजूर होते. त्यांचे मोठे भाऊ अजित यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सादाजी ठाकोर, विष्णुजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतजी ठाकोर, जवांजी ठाकोर और विनुजी ठाकोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

लक्ष्मीपारा गावात राहणारे अजित यांनी सांगितले की, ही घटना बुधवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. जसवंत हे त्यांच्या घराजवळील मेलडी माता मंदिरात लाऊडस्पीकरवर आरती करत होते. तेव्हा सादाजी यांनी लाऊडस्पीकर का लावला आहे याबाबत विचारणा केली. त्यानंतर वाद वाढत गेला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *